पुणे

Manchar News : आंबेगाव तालुक्यात बाल विवाह मुक्त भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू

'आंबेगाव तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा व ग्रामपंचायतींना आपल्या गावात परिसरात एकही बालविवाह होणार नाही याविषयी काळजी घेण्याच्या व जनजागृती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

डी. के. वळसे पाटील

मंचर - 'कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्ली (नोबेल पुरस्कार विजेते), ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर (ता.आंबेगाव) व आंबेगाव तालुका पंचायत समिती यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बालविवाह मुक्त भारत अभियानाची प्रभावीपणे जनजागृती व अमलबजावणी सुरु आहे.

बाल विवाहामुळे होणाऱ्या अनिष्ठ परिणामांची माहिती सांगितली जाते. या प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी प्रशासनाकडून ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेस अन्य सामाजिक संस्थाना सहकार्य केले जाईल.' अशी ग्वाही आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी दिली.

अभियानाबाबत वाळूज म्हणाल्या, 'आंबेगाव तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा व ग्रामपंचायतींना आपल्या गावात परिसरात एकही बालविवाह होणार नाही याविषयी काळजी घेण्याच्या व जनजागृती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

दरम्यान मंचर येथे सोमवारी (ता.१६) महात्मा गांधी विद्यालयात बालविवाह मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे पाटील, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी बालविवाह होऊ देणार नाही. अशी सामूहिक शपथ विद्यार्थिनींना देण्यात आली.

काळे-पाटील म्हणाल्या 'या अभियानासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये व पोलीस खात्याचे चांगले सहकार्य मिळत आहे. आंबेगाव तालुका शंभर टक्के बालविवाह मुक्त करण्याचे धोरण आहे. बालविवाहमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली जाणार आहे त्यासाठी तज्ञ महिला डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली जातात' अर्चना टेमकर यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT