पुणे

मंचर शहरात दोन तास अंधार

CD

मंचर, ता. १ : महावितरणच्या अकार्यक्षम कारभारामुळे मंचर (ता. आंबेगाव) शहरातील १६ हजार वीज ग्राहकांना मंगळवारी (ता. १) रात्री दोन तास अंधारात राहावे लागले. सायंकाळी सातपर्यंत वीजपुरवठा खंडित असल्याने घरगुती ग्राहकांसह रुग्णालय आणि व्यावसायिकांचे मोठे हाल झाले. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मागील आठ-दहा दिवसांपासून मंचर शहर व परिसरात दिवसा तसेच रात्री वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ‘‘मंगळवारी अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यानंतर सत्यनारायण पूजा व भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने संबंधित कुटुंबांना जनरेटरची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागली,’’ असे पापा हुले यांनी सांगितले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील विविध खासगी रुग्णालयांच्या कामकाजावरही वीजखंडित होण्याचा परिणाम झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णसेवा सुरळीत ठेवताना डॉक्टर व परिचारिकांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांनी शेवाळवाडी-मंचर वीज उपकेंद्रातील ऑपरेटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित ऑपरेटर फोन उचलत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या.
‘‘मंचर शहराला नियमित वीजपुरवठा मिळावा आणि वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार तातडीने थांबवावेत, या मागणीसाठी मंचरकरांचे शिष्टमंडळ राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची लवकरच भेट घेणार आहे,’’ अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी दिली.

मंचरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पावसाची भुरभुर सुरू असतानाही दहा जनमित्र आणि तीन अधिकारी दुरुस्तीचे काम करीत आहेत. नेमका फॉल्ट कोठे आहे, हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
- जी. एम. शेख, सहाय्यक अभियंता, महावितरण कंपनी, मंचर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

माजी माओवादी नेता भूपतीवर मोठी जबाबदारी; विद्यापीठात समन्वयक म्हणून करणार मार्गदर्शन

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT