पुणे

मंचर शहरातील बारवेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

CD

मंचर, ता. २३ : मंचर शहरातील ऐतिहासिक बारवेवरील अतिक्रमण तातडीने हटवावे, अन्यथा २१ दिवसांनंतर स्वतः जेसीबी घेऊन अतिक्रमण हटविण्याचे आंदोलन छेडू, असा इशारा हिंदुत्ववादी नेते प्रमोद बाणखेले यांनी तहसील प्रशासनाला दिला.
यासंदर्भात घोडेगाव येथील तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल सारंग यांची भेट घेऊन बारवेच्या संरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, नायब तहसीलदार सचिन मुंढे, मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाणखेले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, बारवेवरील अतिक्रमणाबाबत अद्याप कारवाई का झाली नाही? असा थेट सवाल केला. बारव परिसराची अधिकृत मोजणी करून हद्द निश्चित करावी आणि अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. हा कोणत्याही व्यक्तीविरोधातील संघर्ष नसून मंचरच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाचा प्रश्न असल्याचे सांगत, २१ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचा थरार! मार्केट यार्डमध्ये तरुणाचा खून, बिबवेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT