Manchar Forest Zone sakal
पुणे

Women Forest Security : बिबट्यांच्या राज्यात कर्तव्यदक्ष ‘वाघिणी’

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यास मोठ्या प्रमाणात जागा झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यास मोठ्या प्रमाणात जागा झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पारगाव - आव्हानात्मक क्षेत्र असलेल्या वनविभागात आंबेगाव तालुक्यातील मंचर वन परिक्षेत्राअंतर्गत तालुक्याच्या पूर्वेकडील गावात वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक, लेखापाल, कार्यालयीन सहायक, वनमजूर या पदांच्या माध्यमातून एकूण कर्मचाऱ्यांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कार्यरत असून, न डगमगता धाडसाने नागरिकांचे प्रबोधन करून बिबट मानव संघर्ष कमी करत जंगलाचेही संवर्धन करत आहे. या सर्व रणरागीनींचे काम कौतुकास्पद आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यास मोठ्या प्रमाणात जागा झाली आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात दररोज कोठेना कोठे बिबट्याचे दर्शन घडत आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत. त्यामुळे वनविभागातील अधिकाऱ्यांपासून कर्मचारी, वनमजूर या सर्वांना २४ तास सतर्क राहावे लागत आहे. हे आव्हान मंचर वनपरिक्षेत्र विभागातील एकूण १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १० महिला यशस्वीपणे सांभाळत आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल धामणी सोनल भालेराव, लेखापाल मंचर आरती पवार, वनरक्षक लाखणगाव साईमाला गित्ते, वनरक्षक धामणी पूजा पवार, वनरक्षक मंचर पूजा कांबळे, वनरक्षक अवसरी बुद्रुक छकुली शिवशरण, वनरक्षक कुरवंडी सुनंदा वाजे, कार्यालयीन सहायक योगिता वाळके, वनमजूर पार्वता धुमाळ या सर्व संसार व कुटुंब सांभाळून अवघड क्षेत्रातील जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहेत.

या महिला अधिकारी व कर्मचारी दिवस असो की रात्र, तत्काळ घटनास्थळी जाऊन नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करणे, बछडे सापडले असेल; तर बिबट मादी आसपास असल्याने ती चवताळू नये म्हणून सापडलेल्या ठिकाणीच बछडे ठेऊन मादी जोपर्यंत बछडे नेत नाही, तोपर्यंत ट्रॅप कॅमेराच्या माध्यमातून लक्ष ठेवणे, बिबट्याचा उपद्रव जास्त असलेल्या ठिकाणी पिंजरा लावणे, पिंजऱ्यात सापडलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सुरक्षित पोहच करणे, विहिरीत पडलेले बिबटे असो की इतर वन्यप्राणी यांना ग्रामस्थ व रेस्क्यू पथकातील सदस्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढून त्यांनाही माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सुरक्षित पोहच करणे, बिबट प्रवण क्षेत्रात रात्रीची गस्त घालणे, बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वनविभागाच्या वतीने प्रबोधनही वनविभाग करत असते. मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्या किंवा अपघातात ठार झालेल्या बिबट्याचे पशुवैद्यकाकडून शवविच्छेदन करणे, त्याचे नियमानुसार अंत्यसंस्कार करणे आदी कामे करतात.

तसेच, उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे आटल्यानंतर वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून हाल होऊ नये म्हणून कृत्रिम पाणवठे तयार करणे, वन विकास कार्यक्रम राबवणे, रोपवाटिकेत नवीन रोपे तयार करून दर वर्षी पावसाळ्यात नवीन वृक्षारोपण करणे, उन्हाळ्यात डोंगराला वणवा लागल्यास या सर्व महिला अधिकारी तातडीने घटनास्थळी जाऊन जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करून आगीपासून जंगलाचे संरक्षण करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT