पुणे

मंचर बाजार समितीची ‘पेपरलेस’कडे वाटचाल

CD

मंचर, ता. ६ : बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने संपूर्ण कामकाज डिजिटल करण्यासाठी अत्याधुनिक संगणक प्रणाली विकसित केली आहे. शेतकरी, मापाडी, लेखा विभाग तसेच प्रशासकीय कामकाज एकात्मिक प्रणालीशी जोडण्यात आले असून, ‘पेपरलेस’ बाजार समितीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
बाजार समिती ‘पेपरलेस’ करण्यासाठीचे सॉफ्टवेअर इग्निक्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ‘AgriX शेतकरी ॲप’ विकसित केले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
नवीन प्रणालीद्वारे मालाची आवक, वजन, व्यवहार नोंदी, लेखा व्यवस्थापन, पत्रव्यवहार आणि विविध अहवाल संगणकीकृत करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यवहारांची माहिती तत्काळ उपलब्ध होऊन कामकाजात पारदर्शकता व अचूकता वाढणार आहे.
शेतकऱ्यांना मालाचे वजन, विक्रीचा तपशील, व्यवहाराची रक्कम व पूर्वीचे व्यवहार मोबाईलवर एका क्लिकवर पाहता येणार आहेत. तसेच बाजारभाव, हवामान, बाजार समितीच्या सूचना, कृषी विषयक माहिती व शासनाच्या योजनांची माहितीही उपलब्ध होणार आहे.
शेतकरी अपघात विमा योजनेसाठी ॲपद्वारे KYC करून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, कागदपत्रांसाठी बाजार समितीत येण्याची आवश्यकता राहणार नाही. दरम्यान, पावत्या, देयके, उत्पन्न-खर्च, बँक व्यवहार, खातेवही व लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहितीही डिजिटल पद्धतीने तयार होत आहे. त्यामुळे ‘डिजिटल व्यवहार, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम शेतकरी’ या उद्देशाने बाजार समितीने आधुनिकतेकडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

SCROLL FOR NEXT