पुणे

मंचरमध्ये ठेकेदारांना मिळेना टक्केवारीशिवाय कामाची बिले

CD

मंचर, ता. १८ : मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीमध्ये टक्केवारी घेतल्याशिवाय ठेकेदारांची कामांची बिले काढली जात नाहीत, असा गंभीर आरोप नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी बुधवारी (ता. १८) मुख्याधिकारी किरण मार्कंड यांच्यासमोर केला.
थोरात म्हणाले, ‘‘नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असतानाच्या ठेकेदारांची बिले प्राधान्याने काढली जातात. मात्र, सध्याच्या ठेकेदारांना बिलांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. बिले काढण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.’’
शहराच्या विकास आराखड्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि हरकती नोंदवून घेण्यासाठी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दररोज नगरपंचायतीत उपस्थित राहावे, अशा सूचना देऊनही कार्यवाही झालेली नाही. पाणीपुरवठा विभागातील १४ कर्मचाऱ्यांना प्रवास खर्च मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीच्या काळात प्रतिदिन ५० रुपये मिळत होते. आता किमान १०० रुपये मिळावेत, अशी अपेक्षा आहे. रामदास बडे यांचा बांधकाम परवानगीचा प्रस्तावही वर्षभरापासून प्रलंबित आहे. अनेक कामे रखडली असून, नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी मागणीही थोरात यांनी केली.
दरम्यान, मुख्याधिकारी किरण मार्कंड म्हणाल्या, ‘‘बिले काढण्यासाठी कोणी टक्केवारी मागत असल्यास त्याची चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल. ठेकेदारांची बिले उपलब्ध निधी आणि प्राधान्यक्रमानुसार काढली जातात. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चाबाबत मासिक बैठकीत निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी विकास आराखड्याबाबत आपल्या हरकती विहित मुदतीत नगरपंचायतीकडे सादर कराव्यात. नागरिकांना न्याय देण्याची भूमिका नगरपंचायतीची राहील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

Latest Marathi News Live Update : शक्तिपीठ महामार्गावरून शिंदे सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; सत्ताधारी आमदार शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या पुस्तकाने रचले विक्रीचे नवे विक्रम! तब्बल 'एवढ्या' कोटींचा झाला व्यवसाय

Pune Water Scarcity : तर पुणेकरांवर तीव्र पाणीकपातीचे संकट येईल - प्रशांत जगताप

SCROLL FOR NEXT