पुणे

मंचर बाजारात कांद्याचे दर स्थिर

CD

मंचर, ता. १२ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याची आवक वाढली असली तरीही बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र मंगळवारी (ता. १२) पाहायला मिळाले. बाजार समितीत दहा किलो कांद्याला कमाल १३० रुपये दर मिळाल्याची माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली. मंचर बाजार समितीत एकूण १४ हजार २६० कांदा पिशव्यांची आवक झाली. आवक वाढल्यानंतरही बाजारभावात मोठी घसरण झाली नसल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. बाजार समितीतील प्रति दहा किलो सुपर गोळा (नंबर १) कांद्यास १२० ते १३० रुपये, नंबर २ कांद्यास ९० ते १२० रुपये, तर गोल्टी व गोल्टा प्रकारातील नंबर ३ कांद्यास ४० ते ८० रुपये दर मिळाला. बदला कांद्यास १० ते ४० रुपये बाजारभाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याची आवक वाढत असली तरी मागणी कायम असल्याने बाजारभाव स्थिर राहिल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT