पुणे

कांद्याचा बाजारभाव मंचर बाजारात तेजीत

CD

मंचर, ता. १८ : मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १८) कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी पाहायला मिळाली. उत्तम प्रतीच्या कांद्याच्या १० किलोसाठी तब्बल ५५१ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याची सुमारे २५ हजार ४८० पिशव्यांची आवक झाली. बाजारातील कांद्याची आवक, प्रत आणि गुणवत्तेनुसार दर निश्चित होत असून, उत्तम प्रतीच्या कांद्याला चांगला उठाव मिळत आहे.
दरम्यान, कांद्याला मिळालेला ५५१ रुपये प्रति दहा किलो हा सध्याचा उच्चांकी दर असल्याचे बाजार समितीचे सभापती नीलेश विलास थोरात यांनी सांगितले. उच्चांकी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे उपसभापती सचिन हरिभाऊ पानसरे यांनी सांगितले.
बाजार समितीत कांद्याला मिळालेला बाजारभाव (प्रति दहा किलो) पुढीलप्रमाणे : सुपर गोळे : ४५०-४७०, सुपर मुक्कल : ४००-४२०, अवरेज-मेडियम (दोन नंबर) : ३९५-४१०, गोल्टी व गोल्टा (चार नंबर) : ३६०-३९०, बदला व चिंगळी : १५०-२५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: श्रीलंकेने ऐनवेळी मैदानात का उतरवला '१२ वा खेळाडू', ज्याचा मानव सुथारने पहिल्याच चेंडूवर केला गेम ओव्हर?

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास बुधवारपासून होणार सुरवात

मी दिलेला निर्णय शाश्वत, सिब्बल यांचे आरोप बिनबुडाचे! राहुल नार्वेकरांचं जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

FDA Crime : हॉटेल ‘चूल मटन’ला एफडीए चा दणका; स्वच्छता, आरोग्यविषयक नियमांचे पालन होत नसल्‍याने परवाना निलंबित

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT