पुणे

पुणे-नाशिक लोहमार्गाच्या कामाला पुढील वर्षी प्रारंभ

सकाळवृत्तसेवा

मंचर - ‘‘पुणे-नाशिक लोहमार्गाच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. रेल्वेचे काम पुढील वर्षी सुरू होणार आहे,’’ असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजित कार्यक्रमात आढळराव पाटील बोलत होते. या वेळी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, सहसंपर्कप्रमुख ॲड. अविनाश रहाणे, राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, रवींद्र करंजखिले, सुनील बाणखेले, सरपंच दत्ता गांजाळे, लक्ष्मण काचोळे उपस्थित होते. सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी आढळराव पाटील यांनी पराग साखर कारखान्यासंदर्भात दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘भीमाशंकर कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी खासगी पराग कारखाना उभा केला आहे. खासगी कारखाना ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. मी आता गप्प बसणार नाही. अनेक गोष्टी बाहेर येतील. त्यासाठी मी वेगळी यंत्रणा तयार केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai CNG PNG Price Hike : मुंबईकरांच्या खिशाला आजपासून डबल कात्री! CNG-PNG महागला, रिक्षा-टॅक्सी भाड्यातही वाढ

“अभिनेत्याशी लग्न करणं म्हणजे सगळ्यात कठीण गोष्ट”; जया बच्चन यांनी अर्शदच्या पत्नीला दिलेला सल्ला, म्हणाल्या...

रॅपर बादशाहचा घटस्फोट! दुसरं लग्न ५ महिन्यात मोडलं, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Marathi News Live Updates : हायवेवर नव्या कारचं रील करणं भोवलं, पुण्यात पोलिसांनी फॉर्च्युनर घेतली ताब्यात

Sangli Crime: सांगलीत साडेचार कोटींची ‘व्हेल’ची उलटी जप्त; संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील, तस्कर सिंधुदुर्गातील

SCROLL FOR NEXT