मंचर, ता. १३ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) अंतर्गत असलेल्या मंचर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाल्याने विद्यार्थिनींनी आंदोलन स्थगित केले.
मंचर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या मुख्य जलवाहिनीत बिघाड झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. प्रश्न न सुटल्याने विद्यार्थिनींनी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) नेतृत्वाखाली बुधवारपासून (ता. ११) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई व अन्य अधिकाऱ्यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थिनींशी चर्चा केली. त्यानंतर फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तसेच, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, संगणक कक्षासाठी संगणक उपलब्ध करणे, जेवणाच्या दर्जात सुधारणा आणि वसतिगृहातील विद्युत दुरुस्ती लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर गुरुवारी (ता. १२) आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व नवनाथ मोरे, समीर गारे, रोहिदास फलके, समीक्षा केदारी, यश गबाले यांनी केले. अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.