मंचर, ता. ७ : मंचर (ता. आंबेगाव) शहरात पावसाळ्यात तसेच वादळी वाऱ्याच्या वेळी वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य व अंतर्गत मार्गांवरील विद्युत वाहिन्या भूमिगत (अंडरग्राऊंड) करण्याची मागणी मंचर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणच्या आंबेगाव-जुन्नर विभागाचे मंचर येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.
मंचर शहरातील अनेक भागांत विद्युत तारांचे जाळे उघड्यावर असून काही ठिकाणी तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात थोरात यांनी नमूद केले आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये विद्युत तारांचे जाळे असल्याने शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याचे नगरसेविका ऊर्मिला मोरडे व मालती थोरात यांनी सांगितले . यावेळी नगरसेवक धनेश मोरडे, सोनाली बाणखेले, विशाल आवळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
“नागरिकांची सुरक्षितता आणि शहराच्या भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन मंचर शहरातील विद्युत वाहिन्या टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. याकामी नगरपंचायत महावितरण कंपनीला सहकार्य करेल.
-लक्ष्मण थोरात, उपनगराध्यक्ष, मंचर नगरपंचायत
•वीज वाहिन्याची एकूण लांबी : १६ किलोमीटर
•घरगुती वीज जोड : १५ हजार १८२
•व्यावसायिक जोड : २ हजार १०९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.