Mandakini Raut helped the students
Mandakini Raut helped the students  
पुणे

एक-दोन नव्हे, 15 नातवंडांचा सांभाळ करणारी जिगरबाज आजी!

महेश जगताप

पुणे : कोरोना हे नाव जरी कानावर ऐकलं तरी माणूस चिंतातुर होऊन जातं होता .मागच्या तीन महिन्यांच्या काळात जवळची मानसंसुद्धा एकमेकांच्या जवळ जाण्यास घाबरत होती. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. कोणालाच कोणाचे सुखदुख नव्हते. त्यातल्या त्यात वयस्कर व्यक्ती म्हटल्यावर आणखी भीती, धोका पण याही काळात स्पर्धा परीक्षेचे अनेक विद्यार्थी शहरातच अडकले होते. कोरोनाच्या संकटाच्या काळात सत्तर वर्षाच्या आजी मंदाकिनी राऊत यांनी तुम्ही माझे नातूच आहात, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला उपाशी ठेवणार नाही असं म्हणत १५ स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना जेवण दिले. खर्या अर्थाने त्या या नातवांसाठी बाहुबली ठरल्या आहेत.

मार्चमध्ये अचानक लॉकडाउन झाल्याने सर्वांचीच धांदल उडाली विशेषतः शहरातील विद्यार्थी वर्गाची घरी जायची इच्छा असतानाही घरी आपापल्या गावी जाता आले नाही. त्यामुळे त्यांना शहरात अडकून राहावे लागले. पण शहरात ही अत्यंत कडक लॉकडाऊन व भीतीचे वातावरण असल्याने सर्व मेस धारकांनी मेस बंद केल्या. त्यामुळे विद्यार्थी वर्गांची मोठ्या प्रमाणात जेवणाची अडचण होऊ लागली. पण राउत आजी यांनी मुलांना आधार देत घाबरून जायचं अजिबात कारण नाही मी तुम्हाला कितीही खराब परस्थिती आली तरी जेवण देणार आहे. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आणि निश्चित रहावा असा आधार विद्यार्थ्यांना दिला.

या आजी गेल्या दहा वर्षांपासून सदाशिव पेठेत मेस चालवतात. त्यांनी पंधरा मुलांना या तीन महिन्यांच्या काळात पार्सल जेवण पुरवले. ही पोर माझ्या नातवासारखी आहेत, मग त्यांना मी अश्या संकटाच्या काळात कशी एकटे सोडणार. ही वेळच होती एकमेकांना आधार देण्याची. आपण माणसं आहात तर माणसासारखं राहीलं पाहिजे. मलाही या काळात अडचणी आल्या पण मी डगमगली नाही, असे मत आजींनी सकाळशी बोलताना व्यक्त केले .

अचानक लॉकडाऊन  जाहीर झाला आणि समोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. पण आजींनी कोणीही घाबरायचे नाही मी तुम्हाला डब्बा पुरवते तुम्ही निश्चिंत राहा. मला आश्चर्य वाटते ज्या वेळी तरुण लोक घाबरून घरात बसली होती, त्या वेळी सत्तर वय असताना आम्हाला असल्या कठीण काळात आजींनी जगवलं. खरच आजी आमच्यासाठी संकटकाळात देवासारख्या धावून आल्या. -मिलिंद पाटील, विद्यार्थी

आजी या आम्हाला याच काळात नाहीतर गेल्या पाच वर्षांपासून सांभाळत आहेत. कित्येक मुलांकडे सहा सहा महिने पैसे नसतात पण त्यांनी पैशामुळे कधी कोणाला उपाशी ठेवले नाही. लाखात असं एखादं माणूस सापडतं. -रायचंद वाघ, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT