Mandap Sakal
पुणे

मंडप व्यावसायिकांची आर्थिक उपासमार

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार गेले.

आरती मेस्त्री

खडकी - कोरोनामुळे गेल्या वर्षापासून अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार गेले. सरकारने लोकडाउन उठविल्यावर यंदा काही व्यवसाय थोड्याफार प्रमाणात सुरू झाले, मात्र तरीही असे अनेक व्यवसाय आहेत ज्यांना सरकारच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा आहे, यातलाच एक व्यवसाय म्हणजे मांडववाल्याचा! गणेशोत्सवाच्या काळात मोठी मागणी असलेला हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे सध्या चित्र आहे.

सलग दोन वर्षांपासून बंद असलेल्या या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची खंत खडकी मंडप, साउंड -लाइट असोसिएशनचे उपाध्यक्ष हुसेन कुरेशी, सल्लागार इम्रान तांबोळी, विल्यम दास यांनी ‘सकाळ’कडे मांडली. गेली ३० वर्षे खडकी, बोपोडी, दापोडी भागात ही संघटना सेवा देत आहे. मात्र व्यवसाय ठप्प झाल्याने या व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्ती आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे मांडववाल्यांनी सांगितले.

आमच्या संघटनेचे खडकी, बोपोडी, दापोडी भागातील पन्नासपेक्षा अधिक सभासद असून, काम ठप्प झाल्याने या सगळ्यांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. पुण्यातील आमच्या सलग्न संघटनेने या संदर्भात गेल्या ऑक्टोबरला आंदोलनही केले होते, मात्र त्याची अद्यापही दखल सरकारकडून घेण्यात आलेली नाही. तसेच लोकप्रतिनिधी ही आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला कोणी वाली नसल्याची खंत वाटते

- डेव्हिड फ्रँसिस, अध्यक्ष, खडकी मंडप-साउंड लाइट असोसिएशन

वापर होत नसल्याने साउंड सिस्टिम गंजून गेले आहेत. या वस्तू गोडाऊनमध्ये पडून खराब झाल्याने ते पुन्हा दुरुस्त करायलाही आमच्याकडे पैसे नाहीत. दोन वर्षे काम नसल्याने बँकेचे हप्ते थकले आहेत. सध्या मिळेल ते काम करून घर चालवावे लागत आहे. गेल्या वर्षभरात जिथे साउंड सिस्टिमचे काम केले त्यांनी अद्याप थकबाकी दिली नाही. सरकारने आमच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आमच्या बँक हप्त्यामध्ये सूट मिळावी, अशी आशा आहे.

- सय्यद नाझीम, खजिनदार, खडकी मंडप, साउंड-लाइट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT