पुणे

तुमचं लग्न ठरलयं! पत्रिका छापण्यापूर्वी सरकारचा नवा नियम ...

CD

लग्नपत्रिकेत वधू-वरांचे वय बंधनकारक करा
बालविवाह रोखण्यासाठी राज्य बालहक्क आयोगाची सरकारकडे शिफारस
शांताराम काळे ः सकाळ वृत्तसेवा
अकोले, ता. ८ : राज्यातील वाढत्या बालविवाहांच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वर यांच्या जन्मतारखेचा उल्लेख बंधनकारक करण्यात यावा, अशी शिफारस आयोगाने राज्य सरकारकडे केली आहे. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा नियम लागू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात आयोगाने गृह विभाग, तसेच महिला व बालविकास विभागाला पत्र पाठविले असून, लग्नपत्रिका छापण्यापूर्वी प्रिंटिंग प्रेसचालकांनी वधू-वरांचे आधारकार्ड किंवा जन्मदाखला तपासणे आवश्यक करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाहासाठी पत्रिका छापल्याचे आढळल्यास संबंधित प्रिंटिंग प्रेस, तसेच मंगल कार्यालयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली माता झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर आयोगाने हा प्रस्ताव पुढे आणल्याचे सांगितले जात आहे. विवाह प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि बालविवाह रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
भारतीय कायद्यानुसार मुलीचे विवाहासाठी किमान वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे लग्नपत्रिकेवर जन्मतारीख नमूद केल्यास संबंधित वधू-वर कायदेशीर वयोमर्यादेत आहेत की नाही, हे सहज स्पष्ट होणार आहे.
कोट
महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राजस्थान पॅटर्नप्रमाणे हा नियम राज्यात लागू करण्याबाबत विचार सुरू आहे.
-फारूक शेख, बालविकास विभाग, मंत्रालय
---------------
भारतातील कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे असणे आवश्यक आहे. या नियमामुळे बालविवाह रोखण्यास मदत होईल.
संजय कदम, जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT