पुणे

ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडवगण फराटात ऐरणीवर

CD

मांडवगण फराटा, ता. २४ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गायकवाड मळा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वीजपुरवठा बंद राहत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ, पशुधन तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गायकवाड मळा येथील वीजपुरवठा पूर्णवेळ सिंगल फेजवर सुरू ठेवावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने महावितरणच्या शिरूर शाखेकडे केली आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत यापूर्वी २० ऑगस्ट रोजी पत्र देण्यात आले होते. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. गायकवाड मळा परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून जिल्हा परिषद शाळाही आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण होत आहे. ग्रामस्थांची सुरक्षितता लक्षात घेऊन सायंकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीतही वीजपुरवठा सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गायकवाड मळा परिसरात वीजपुरवठा पूर्णवेळ सिंगल फेजवर करण्याची मागणी ग्रामस्थांसह सरपंच समीक्षा अक्षय फराटे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत बनत आहेत 4 मोठे राजयोग; माता लक्ष्मीच्या कृपेने 'या' राशी होणार मालामाल, करिअरमध्येही प्रगतीचे संकेत

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

SCROLL FOR NEXT