Dr. Rajendra Singh
Dr. Rajendra Singh sakal
पुणे

Dr. Rajendra Singh : पीकपद्धतीत बदल न केल्यास जमीनींचे वाळवंट होणार

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा - 'जमीनी क्षारपड होऊ लागलेल्या पट्ट्यातील शेतकर्‍यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल न केल्यास जमीनींचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही.' असा इशारा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ, भारताचे जलपुरुष, आंतरराष्ट्रीय पूर व दुष्काळ आयोगाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला. ते गणेगाव दुमाला (ता. शिरूर, जि. पुणे) येथील शेतकर्‍यांशी क्षारपड जमीनीची समस्या या विषयावर बोलत होते.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील क्षारपड जमीनीची सुधारणा कामाची पाहणी करण्यासाठी ते तांदळी व गणेगाव दुमाला याठिकाणी आले होते. या परिसरातील ऊस शेती, पीक पद्धती, सिंचन पद्धती, रासायनिक खतांचा वापर व मिळणारे उत्पन्न याविषयी येथील शेतकर्‍यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. शेती करताना पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च, त्या तुलनेत कमी मिळणारे उत्पादन व उत्पन्न, यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी याविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, 'शेतात लाखो रुपयांची रासायनिक खते टाकण्या ऐवजी शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न जाळता आपल्या शेतातच कुजवले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुकटातले कंपोस्ट खत मिळेल व रासायनिक खतांचा खर्च कमी होईल. पिकांना पाणी देण्यासाठी पाटपाण्याचा वापर करण्याऐवजी ठिबक सिंचनाचा व तुषार सिंचनाचा वापर करावा. उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जमीनीची सुपीकता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी भविष्याचा विचार करून शेती करावी.'

याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य, जलदूत राजेंद्र गदादे, काकासाहेब खळदकर, राजेंद्र कोंडे, गणेगावचे सरपंच तुकाराम निंबाळकर, पोपट निंबाळकर, सचिन मचाले व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी पन्नास शेतकऱ्यांचा गट तयार करून सेंद्रिय शेती करण्याची तयारी दाखवली.

यावेळी यशदा या संस्थेचे कार्यकारी संचालक, राज्य स्तरीय नदी संवाद यात्रेचे सदस्य डॉ. सुमंत पांडे, भूगर्भ तज्ज्ञ डॉ. बडगबळकर, मानवलोकचे अनिकेत लोहिया, उमेद संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक सपना करकांडे, जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुघ, जलनायक रमाकांत कुलकर्णी, अनिल पाटील, जलसंपदा विभागाचे श्री. देवकर, श्री. जगताप हे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब खळदकर यांनी तर आभार सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT