पुणे

मांडवे येथे अपघातात एक ठार, तीन जखमी

CD

मांडवे येथे अपघातात
एक ठार, चार जखमी
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. १६ : पुणे- पंढरपूर या पालखी महामार्गावर मांडवे हद्दीत असणाऱ्या आशीर्वाद ढाब्याजवळ शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० वाजता टेम्पो (केए २८- एए ३०८७) चालकाने आपला टेम्पो हयगयीने चालवून समोरून येणाऱ्या कारला (एमएच १३- एझेड ८३०८) धडक दिली. या अपघातात कारमधील बेबी वसंत शिंदे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
कारमधील वसंत पांडुरंग शिंदे (वय ६०), साक्षी अमर शिंदे (वय २१), देवांश अमर शिंदे (वय २२, रा. मांडवे) यांच्यासह टेम्पो चालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातास टेम्पो चालक कारणीभूत असल्याने त्याच्याविरुद्ध मृत बेबी शिंदे यांचे पुतणे नीलेश सुरेश शिंदे (वय ३८) यांनी फिर्याद दिली असून, टेम्पो चालकाविरुद्ध (नाव समजले नाही) गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास नातेपुते पोलिस स्टेशन करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT