लोगो : मानेगाव जि. प. वार्तापत्र
---
MDH26B05025
पंडित देशमुख
---
MDH26B05026
पृथ्वीराज सावंत
---
MDH26B05027
सुहास पाटील जामगावकर
---
MDH26B05029
दादासाहेब पारडे
---
MDH26B05030
मीराबाई ठोंबरे
---
MDH26B05031
जयश्री ठोंबरे
---
शिंदे अन् सावंत कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला
मानेगाव गट-गण अन् दारफळ गणातील लढती होणार रंगतदार
किरण चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २३ : मानेगाव जिल्हा परिषद गटातील निवडणूक शिंदे व सावंत कुटुंबासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मानेगाव गट, मानेगाव गण व दारफळ गणातील लढती रंगतदार होणार आहेत.
माढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मानेगाव जि.प. गटातून प्रा. शिवाजीराव सावंत यांचे पुत्र, माजी पं.स. सदस्य व राजवी ॲग्रोचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सावंत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष सुहास पाटील- जामगावकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मानेगाव पं.स. गणातून पंडित देशमुख व दादासाहेब पारडे यांच्यात तर दारफळ गणातून मीराबाई ठोंबरे व जयश्री ठोंबरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
मानेगाव जि.प. गटात भाजपचे नेते रणजितसिंह शिंदे यांनी प्रा. शिवाजीराव सावंत यांना सोबत घेतल्याने संपूर्ण तालुक्यात याचा फायदा भाजपला होणार आहे. शिवाय रणजितसिंह शिंदे यांनी मागील निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याअगोदर प्रा. शिवाजीराव सावंत यांनीही मानेगाव जि.प. गटाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे शिंदे व सावंत यांनी या मतदारसंघात केलेली कामे, असलेल्या जनसंपर्काचा फायदा या निवडणुकीत पृथ्वीराज सावंतांना होणार आहे. शिंदे व सावंतांची एकत्रित ताकद पृथ्वीराज सावंतांना फायदेशीर ठरणार आहे. प्रा. सावंत व देशमुख कुटुंबातील गट व गणातील समेटही पथ्यावर पडणार आहे.
दुसरीकडे, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व शिंदे यांचे समर्थक राहिलेले सुहास पाटील- जामगावकर यांना आपल्या गोटात खेचत या गटातून आव्हान निर्माण केले आहे. मानेगावातील पारडेंनाही काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतलेल्या या दोघांनाही उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने या मतदारसंघात केलेली राजकीय खेळी त्यांना फायदेशीर ठरणार आहे.
मानेगाव जि.प. गटात पंडित साळुंके, पंडित देशमुख, पृथ्वीराज सावंत, दत्तात्रय जाधव, पृथ्वीराज जाधव, ऋतुराज सावंत, माणकोजी भुसारे, संजय भोगे, सुनील पाटील, सुहास पाटील, गणपतराव ऊर्फ दादासाहेब साठे, विश्वजित पाटील, शिवाजी शिरसट, क्रांतिकुमार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
---
चौकट
दादासाहेब साठेंच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यात राजकीय कुरघोड्यांमुळे अपयशी ठरलेल्या दादासाहेब साठे यांची मानेगाव गटातील भूमिका दोन-तीन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
---
मानेगाव गटातील गावे
- मानेगाव गण : मानेगाव, रिधोरे, तांदूळवाडी, अंजनगाव (उमाटे), वडाचीवाडी (अं.उ.), राहुलनगर, जामगाव, केवड, कापसेवाडी/ हटकरवाडी, धानोरे, बुद्रूकवाडी, चव्हाणवाडी.
- दारफळ (सीना) गण : पापनस, वडशिंगे, निमगाव (मा.), दारफळ (सीना), महातपूर, उंदरगाव, वाकाव, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, कुंभेज, खैराव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.