पुणे

#MondayMotivation एचआयव्ही बाधितांना मिळाले जीवनसाथी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी -  कुणी दहावी, कुणी उच्चशिक्षित अभियंता. कुणी गृहिणी, घटस्फोटित. कुणाचा दरमहा 80 हजार पगार, तर कुणाचा व्यवसाय. कामगार, नोकरदार असे सगळेच. कुणी 19 वर्षांची युवती, तर कुणी 50-55 वर्षांचे गृहस्थ. कुणी मुंबईहून मराठवाड्यातून. तेलंगण, उत्तर प्रदेशातून आलेले. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी, कौटुंबिक पार्श्‍वभूमी भिन्न. धर्म, पंथ, जात, प्रांत वेगळा. भाषा वेगळी. आस फक्त एकच सहजीवनाची आणि खंतही एकच "एचआयव्ही पॉझिटिव्ह' असल्याची; पण या सर्वांना एकत्र आणण्याची किमया साधली, मंगलमैत्री मेळाव्याने विवाह बंधनात बांधण्याची. 

एचआयव्ही बाधित व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, त्यांच्यात आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि सुखी, समृद्ध व आनंदी जीवन जगता यावे, या उद्देशाने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्‍चरर्स लिमिटेड, चाकणचे यश फाउंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल, चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, एनएमपी प्लस पुणे, विहान प्रकल्प मालेगाव आणि चिंचवडच्या प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांच्यातर्फे रविवारी (ता. 25) चिंचवडला मंगलमैत्री मेळावा झाला. महिंद्राचे प्रकल्प प्रमुख नचिकेत कोडकानी, त्यांच्या पत्नी वनिता कोडकानी, अधिकारी सनी लॉपेझ, रणजित देशमुख, मार्शल थॉमस, कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शाह, सचिव दीपक शहा, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, वैभव पवार आदी उपस्थित होते. 

असा झाला मेळावा 
विवाहेच्छूंची नोंदणी करताना जन्म दाखला, वयाचा दाखला, एआरटी पुस्तकाची झेरॉक्‍स, एचआयव्हीचा रिपोर्ट, घटस्फोटित असल्यास पुरावा, साथीदाराच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रत घेतली. व्यासपीठावर येऊन परिचय दिला. मुलींच्या पसंतीनुसार कुटुंबीयांसमवेत मुलाशी चर्चा केली. होकार मिळाल्यावर पुढील बोलणीची तारीख ठरली. 

प्रातिनिधिक विवाहेच्छू 
- संरक्षण विभागात अधिकारी. विधुर. दरमहा 80 हजार पगार. मनमिळाऊ, सांभाळून घेणारी, कोणत्याही समाजाची, धर्माची चालेल. 
- बारावी उत्तीर्ण तरुण. व्यावसायिक. मासिक उत्पन्न 40 ते 45 हजार. शिक्षित असावी. नोकरी करू शकते. नोकरी नसली तरी चालेल. 
- नर्सिंग कोर्स करून सामाजिक क्षेत्रात सक्रिय तरुणी. उच्चशिक्षित, देखणा व समजून घेणारा तरुण असावा. 
- बीए पदवीधर तरुणी. खासगी कंपनीत नोकरी करणारी. मुलगा कमावता असावा. आई असल्यास प्राधान्य. धर्माचे, जातीचे बंधन नाही. 
- पत्नी निघून गेली. दोन मुले आहेत. त्यांना सांभाळणारी सहचारिणी हवी. विधवा, घटस्फोटित चालेल. मुलांसह तिला स्वीकारणार. 

दोघांचा फुलला संसार 
गेल्या वर्षी चाकणच्या मेळाव्यात तरुण परिचय देऊन गेला. सायंकाळी युवतीसह आई-वडील आले. मुलगी पॉझिटिव्ह असल्याने आई रडत होती. त्यांचे ऐकून घेतल्यावर संयोजक रवींद्र पाटील यांच्यासमोर तरुणाचा चेहरा आला. आठ-पंधरा दिवसांत दोन्ही कुटुंबांसोबत बैठकी झाल्या. विवाह झाला. आता मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. पती-पत्नीसह दोघांचेही कुटुंब मेळाव्यात स्वयंसेवकाच्या भूमिकेत होते. 

औषधोपचारांनी मूल "सुदृढ' 
यापूर्वीच्या मेळाव्यात विवाह जुळविलेल्या दांपत्याचे मूल पॉझिटिव्ह होते. दोघांचे डॉक्‍टरांच्या माध्यमातून समुपदेशन केले. दोघांसह मुलावर औषधोपचार सुरू झाले. कालांतराने दुसरे अपत्य जन्मास घालण्याचा निर्णय दोघांनी घेतला. आता चार महिन्यांचा मुलगा पूर्णतः सुदृढ (एचआयव्ही निगेटिव्ह) आहे. हे दांपत्य मुलासह मेळाव्यास उपस्थित होते. समाजाप्रती देणे लागतो, या भावनेतून स्वयंसेवकाच्या रूपाने. 

सकारात्मकतेचा प्रचार 
"जहॉं विश्‍वास भरा जाता, वहॉं एड्‌स नहीं आता', "ना हारे, ना डरे, मिलकर एड्‌स का प्रतिकार करे', "हाथ से हाथ, कदम से कदम मिलाएँगे, मिलकर इस देश को एड्‌स से मुक्ति दिलाएँगे' असा विश्‍वास मेळाव्यास उपस्थित विवाहेच्छूंना देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT