PNE26V97817
मंगळवेढा : शिवप्रेमी चौकात उभारण्यात येणाऱ्या टाऊन हॉलची इमारत.
---
टाऊन हॉल होणार ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’
मंगळवेढा न.पा.च्या सभेत ठराव मंजूर; गणेश बाग नूतनीकरण, झोपडपट्टी नियमितीकरणाला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २१ : शहरातील शिवप्रेमी चौकात बांधण्यात आलेल्या टाऊन हॉलला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ असे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहर विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी नगराध्यक्षांनी नागरिकांना विकासासंबंधी सूचना करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिक, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सुचविलेल्या एकूण २६ विषयांवर चर्चा झाली.
‘नमो उद्यान विकसित करणे’ या योजनेअंतर्गत नगरपालिकेजवळील गणेश बागेच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
नगरोत्थान, दलितेतर योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वस्ती सुधारणा योजना, रस्ते अनुदान आदी योजनांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा, कर, आरोग्य व विद्युत विभागासंबंधी काही मुद्द्यांवर स्पष्टता नसल्याने ते पुढील बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, पक्षनेते चंद्रकांत घुले यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
---
गृहनिर्माण संकुल उभारण्यास मंजुरी
नागणेवाडी परिसरातील अतिक्रमित झोपडपट्ट्या नियमित करण्यास तसेच बेघर नागरिकांसाठी गट क्रमांक २७२ मध्ये गृहनिर्माण संकुल उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेच्या वतीने पाचवी ते सातवी वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.