पुणे

मका हमीभाव केंद्रात नोंदणी १९ हजार क्विंटलची,खरेदी 4 हजार क्विंटलची !

CD

मक्याचा फोटो वापरावा.
---
मका नोंदणी १९ हजार क्विंटल, खरेदी ४ हजार क्विंटल!
मंगळवेढ्यात मका खरेदी कोट्याचा तिढा; मुदतवाढ अन्‌ कोटा वाढविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १ : तालुक्यातील खरेदी-विक्री संघाच्या मका हमीभाव खरेदी केंद्रात मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील सुमारे १९ हजार क्विंटल मक्याची नोंदणी झाली आहे. तरी केंद्राला केवळ ४ हजार क्विंटलचा कोटा मंजूर झाल्याने उर्वरित १५ हजार क्विंटल मक्याचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांचा मका देखील शेतात व घरासमोर साठून असल्याने नोंदणीची मुदत व खरेदी कोटा वाढवावा, अशी मागणी जोर धरत आहे.
तालुक्यात जनावरांची संख्या वाढल्याने खाद्यासाठी बाजरी व ऊस क्षेत्र कमी झाले असून, कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात मका लागवडीकडे वळाले आहेत. मात्र, बाजारभाव घसरल्याने मका उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राला सुरवातीला २ हजार क्विंटलचा मर्यादित कोटा देण्यात आला. त्यानंतर टप्प्या- टप्प्याने वाढ झाली असली तरी एकूण कोटा अपुरा ठरत आहे.
नोंदणी झालेल्या ५३२ शेतकऱ्यांपैकी सुमारे १५० जणांना मोबाईल संदेश पाठविण्यात आले असून, त्यापैकी ९२ शेतकऱ्यांकडून २ हजार ७७९ क्विंटल मक्याची खरेदी झाली आहे. मोहोळ तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा मका खरेदी झालेला नाही. उर्वरित १५ हजार क्विंटल मका शेतकऱ्यांच्या शेतात व घरासमोर पडून आहे. चोरीच्या घटनांमुळे अनेकांना हमीभाव २४०० रुपये असताना व्यापाऱ्यांना १४०० ते १७०० रुपयांत मका विकण्याची वेळ येत आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
खरेदी केंद्र उशिरा सुरू होणे, मर्यादित कोटा आणि आयात- निर्यात धोरणाचा परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरिपातील मका अजून पडून असतानाच रब्बी हंगामातील मका बाजारात येऊ लागल्याने साठवणुकीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. कोटा मर्यादित असल्याने अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रातून परत जावे लागत आहे.
-----
कोट
MGV26B15471
मंगळवेढ्याच्या खरेदी- विक्री संघाच्या केंद्रावर मंगळवेढा व मोहोळ या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मागील खरेदीची संख्या पाहता यंदा उद्दिष्ट वाढवून देणे अपेक्षित होते; मात्र उद्दिष्ट कमी करून शेतकऱ्यांकडून होणाऱ्या नाराजीला आम्हाला सामोरे जावे लागते. नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.
- सिद्धेश्वर आवताडे, अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT