लोगो : मंगळवेढा पंचायत समिती
---
PNE26W02391
दीपाली ताड
---
PNE26W02392
जयश्री कवचाळे
---
PNE26W02393
मोहिनी गणपाटील
---
कोण ठरणार सभापतिपदासाठी ‘लाडकी बहीण’?
जयश्री कवचाळे, मोहिनी गणपाटील, दीपाली ताड यांच्यात चुरस
हुकूम मुलाणी : सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १० : मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी भाजपकडून तीन महिला दावेदार पुढे आल्याने कोणत्या ‘लाडक्या बहिणी’च्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार समाधान आवताडे कोणाला संधी देणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी हे पद आरक्षित असल्याने जयश्री कवचाळे (बोराळे), मोहिनी गणपाटील (मरवडे) आणि दीपाली ताड (चोखामेळानगर) या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. चोखामेळानगर गणातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या दीपाली ताड यांचे नावही चर्चेत आहे.
राजकारणात आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक या दोघांची स्वतंत्र ताकद असली, तरी भाजप सत्तेत येण्यासाठी या दोघांचे एकत्र येणे आवश्यक ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांना एकत्र आणल्यानंतर आमदार आवताडे यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर विविध निवडणुकांमध्येही हेच समीकरण कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही परिचारक समर्थकांनी आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मदतीची परतफेड म्हणून परिचारक समर्थकांना सभापतिपदाची संधी दिली जाईल का, याचीही चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या जयश्री कवचाळे यांच्यामुळे रमेश भांजे यांचा विजय सुकर झाल्याने त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सभापतिपद मराठा समाजाला दिल्यास उपसभापतिपदासाठी मल्लिकार्जुन मल्हाळे यांचे नाव चर्चेत आहे. तर लिंगायत समाजाला सभापतिपद दिल्यास उपसभापतिपदासाठी डॉ. अप्पा निकम किंवा विनायक यादव यांचा विचार होऊ शकतो. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
---
चौकट
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेल्यांना संधीची अपेक्षा
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, शिक्षण, बचत गट, बांधकाम, घरकुल, मनरेगा, एकात्मिक बाल विकास व आरोग्य आदी महत्त्वाची कामे पंचायत समितीमार्फत राबविली जातात. त्यामुळे सभापती व उपसभापती पदासाठी ग्रामीण प्रश्नांची जाण असलेल्या आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणाऱ्या व्यक्तीची निवड व्हावी, असा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.