PNE26W62572
मंगळवेढा : नॅशनल बँडी स्पर्धेत यशस्वी महाराष्ट्राच्या संघातील मंगळवेढ्याचे खेळाडू.
---
राष्ट्रीय बँडी स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक
डेहराडून येथील स्पर्धेत मंगळवेढ्यातील १४ खेळाडूंचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २९ : उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय बँडी चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला. या संघात मंगळवेढ्यातील उदयसिंग मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे सात विद्यार्थी आणि सिद्धेश्वर स्केटिंग क्लबचे सात खेळाडू अशा एकूण १४ बालखेळाडूंचा समावेश होता.
डेहराडून येथील हिमाद्री आईस स्केटिंग रिंकवर १७ व १८ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा झाली. प्रशिक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी वेगवान हालचाली, सुसंघटित खेळ आणि प्रभावी बचावाच्या जोरावर कामगिरी केली. नऊ ते १४ वर्षे वयोगटातील या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
या यशाबद्दल उदयसिंग मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक नितीन शिंदे यांचा सत्कार केला. खेळाडूंना शाळा व्यवस्थापन, सिद्धेश्वर स्केटिंग क्लब आणि पालकांचे प्रोत्साहन लाभले.
---
यशस्वी खेळाडू
श्रवण कलुबर्मे, प्रणव डोके, शुभम स्वामी, अर्णव आलीगावे, संग्राम पराध्ये, रुद्राक्ष जामदार, प्राची सावंत पाटील सूर्यवंशी, पियुषराजे, शिवकुमार, श्रेयश डोके, अर्णव पवार, विघ्नेश पाटील, आरुषी अंकुशराव आणि तनय चिखले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.