पुणे

मंगळवेढा बोराळे रस्त्याच्या निकृष्ट व संथ कामाबाबत निवेदन

CD

MGV26B15928
मंगळवेढा : मंगळवेढा-बोराळे या रस्त्याच्या कामाच्या दुरुस्तीबाबत निवेदन देताना ग्रामस्थ.
---
मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या
निकृष्ट, संथ कामाबाबत निवेदन
ग्रामस्थांनी केली कामाच्या चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १४ : मंगळवेढा ते बोराळे रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत, हे काम तत्काळ व दर्जेदार पद्धतीने करण्याची मागणी बोराळे येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन देऊन कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच गणेश गावकरी, शिवसेना कामगार सेनेचे राजकुमार स्वामी, ग्रामपंचायत सदस्य चन्नवीर लंगोटे, ॲड. महेश धनवे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मंगळवेढा-बोराळे रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे झालेले काम अनेक ठिकाणी उखडलेले असून, दर्जा निकृष्ट असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळा जवळ आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच बोराळे गावाजवळील ओढ्यावरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे सिद्धापूर, अरळी व बोराळे गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT