पुणे

कंटेनर दोन कंटेनर च्या समोर समोर धडकेत दोन्ही परप्रांतीय चालकाचा मृत्यू

CD

दोन कंटेनरच्या धडकेत
दोन्ही चालकांचा मृत्यू

मंगळवेढा हुलजंती मार्गावर घटना

मंगळवेढा, ता. १ : मंगळवेढा-हुलजंती मार्गावर रविवारी (ता. १) पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही कंटेनरच्या परप्रांतीय चालकांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले.
याप्रकरणी सावरमल नानालाल गुर्जर (वय २०, रा. मरडा की झोपडीया, ता. कोठडी, जि. भिलवाडा, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ राधेश्याम नानालाल गुर्जर (वय २९) हा पहाटे साडेतीनच्या सुमारास कंटेनर (क्र. आरजे ०६ जीसी २२६४) घेऊन मंगळवेढ्याहून हुलजंतीकडे जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एनएल ०१ एजे ५६१६) चालक मालिका सुखराज पाल (रा. टांड, ता. अमोई, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून धडक दिली. या अपघातात दोन्ही चालकांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कंटेनर चालक मालिका सुखराज पाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे तपास करीत आहेत.

मृतदेह ताब्यात देण्यास उशीर
दरम्यान, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, शासकीय रुग्णवाहिका सातत्याने उपलब्ध ठेवण्याची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातातील मृतदेहांचे शवविच्छेदन मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Mangalwedha Accident: कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू

Ghodegaon electricity issue: आठ दिवसांपासून वीज गायब; घोडेगावातील ३० हेक्टरवरील पिके करपली

IND vs NZ, T20I: पहिल्या ३ सामन्यांत लय सापडली, पण शेवटच्या २ मध्ये काय बिनसलं? श्रेयस अय्यर म्हणाला, 'एका गोष्टीत सुधारणा हवी...'

SCROLL FOR NEXT