पुणे

पुर्व भागातील रस्ता दुरूस्तीसाठी मंगळवेढ्यात रास्ता रोको

CD

MGV26B16689
मंगळवेढा : बोराळे-मंगळवेढा व बोराळे-माचणूर या दोन्ही रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करताना ग्रामस्थ.
---
बोराळे-मंगळवेढा रस्त्याच्या कामासाठी ‘रास्ता रोको’
दोन्ही रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून रखडले; तातडीने दर्जेदार कामाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ६ : बोराळे- मंगळवेढा व बोराळे- माचणूर या दोन्ही रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी बोराळे, सिद्धापूर, अरळी, तांडोर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी व मंगळवेढा शहरातील ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ६) दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. ऐन बाजारा दिवशी झालेल्या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळित झाली.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोराळे- मंगळवेढा व बोराळे- माचणूर हे दोन्ही रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. या रस्त्यांचे एकदाही पूर्ण काम झालेले नाही. खराब रस्त्यांमुळे जीवघेणे अपघात होत असून विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो.
अपघात, प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्याची वेळ किंवा सर्पदंशासारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काम केवळ खड्डे बुजविण्यापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण रस्ता दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने तयार करावा, कामाच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यता तसेच निधीची माहिती ग्रामस्थांना लेखी द्यावी, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन कामात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. तसेच काम सुरू होईपर्यंत मोठे खड्डे व धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.
---
कोट
सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारामार्फत अंदाजपत्रकाप्रमाणे व उर्वरित रकमेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार करून घेण्यात येईल. तसेच हे काम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्यात येईल. तथापि, निधी व डांबर उपलब्धतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- विलास ढेरे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT