पुणे

पुणे - आंबा उत्पादक परिषद

CD

पान ६ मुंबई
------------
आंबा उत्पादकांना ‘दरा’साठी हवा आधार

चंद्रकांत मोकल : कृषी, मूल्यसाखळी परिषदेत केली मागणी

मुंबई : जगातील युद्धजन्य परिस्थिती, हवामान बदल, मार्केटिंग आणि निर्यातीमधील चढ-उतारामुळे आंबा उत्पादक अडचणीत आला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातील घसरणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने आधार द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त नुकतीच राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) येथे नुकतीच कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया मार्केटिंग, कोल्डचेन व वेअर हाउसिंग परिषद झाली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी ते म्हणाले, ‘‘शेतकरी हवामान बदलाला सामोरे जाऊन प्रचंड कष्ट घेऊन मोठ्या प्रमाणात खर्च करून उत्पादन घेतो. मात्र सक्षम मार्केटिंग व्यवस्था नसल्यामुळे तो निष्प्रभ होतो. ही परिस्थिती बदलावी यासाठी सक्षम मार्केटिंग मिळणे आवश्‍यक आहे.’’

राष्ट्रीय शेअर बाजारचे (एनएसई) मुख्य अर्थतज्ज्ञ तीर्थकार पटनाईक यांनी फलोत्पादनातील शेतकऱ्यांना मार्केट संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे खरेदी व प्रकल्प विभागाचे अध्यक्ष बी. नारायण यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कृषी फलोत्पादन रिटेल क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.

पीडीलाइट इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष डॉ. पी. के. शुक्ला यांनी आपल्या मनोगतात, ‘आपल्या देशाला असलेला मोठा समुद्र किनारा पाहता समुद्र शेवाळच्या माध्यामाने प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. यासाठी स्थानिकांनी पुढे येण्याची गरज आहे,’ असे आवाहन केले.

या वेळी कृषी फलोत्पादन, सिंचन, मार्केटिंग प्रक्रिया आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT