पुणे

मॅंगाे मेनिया रेसिपी शो आणि पाककृती स्पर्धा आज

सकाळवृत्तसेवा

‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘सुरक्षित अंतर ठेवा’ नाटकाच्या प्रवेशिका

पुणे - आंबाप्रेमी पुणेकरांसाठी ‘सकाळ मधुरांगण’ने प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’ व आंब्याच्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता राजाराम पूल परिसरातील मॅजेंटा लॉन्स येथे होणाऱ्या या शोमध्ये शेफ प्रसाद ‘मधुरांगण’ सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांना मॅंगो फज, मॅंगो स्मुदी, मॅंगो सालसा, थाई मॅंगो सलाड, कैरस/सासम, असे वैविध्यपूर्ण पदार्थ तयार करायला शिकविणार आहेत.

पुणेकरांसाठी खाद्यपदार्थ, ब्रॅंडेड उत्पादने, भातुकलीचे प्रदर्शन, रोबोटिक्‍सची कार्यशाळा, मराठमोळा रॉक बॅंड, आयपीएल स्क्रीनिंग, मुलांसाठी किड्‌स झोन, व्हर्च्युअल गेमिंग, मराठमोळा सेल्फी पॉइंट अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांचा अंतर्भाव फेस्टिव्हलमध्ये करणारे कर्माज पुणेरी फेस्टिव्हल हे या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक आहेत. रेसिपी शो विनामूल्य असून, प्रदर्शनाला प्रवेश फी भरावी लागेल. प्रदर्शनाच्या वेळेत ‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी ‘सकाळ-मधुरांगण’च्या स्टॉलवर शुक्रवारी दुपारी ४ ते रात्री १० व शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत करता येईल.

पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांसाठी पारितोषिके  
 प्रथम क्रमांक : रु. ४५,००० ची हेलिकॉप्टर राइड- चार व्यक्तींसाठी  
 द्वितीय क्रमांक : रु. २२,५०० ची हेलिकॉप्टर राइड- दोन व्यक्तींसाठी  
 तृतीय क्रमांक : रु. ११,००० ची हेलिकॉप्टर राइड एका व्यक्तीसाठी  
 उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना आकर्षक वॉल क्‍लॉक   
 

स्पर्धेचे नियम व अटी  
स्पर्धा विनामूल्य. आंब्यापासून बनवलेला तिखट किंवा गोड पदार्थ सादर करावा.

स्पर्धेला येताना पदार्थासाठी लागणारा वेळ, साहित्य, खर्च लिहून आणावे. रेसिपी कागदावर फक्त आपला दिलेला नोंदणी क्रमांक मोठ्या अक्षरांत लिहावा.  
पदार्थ फक्‍त २ व्यक्तींना पुरेल इतकाच असावा.

स्पर्धकांनी सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेमध्ये रेसिपी मांडाव्यात. सायंकाळी ७ नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.

परीक्षणाच्यावेळी सजावटीपेक्षा पदार्थाची चव, घटक पदार्थ, कृती व नावीन्यतेला महत्त्व.

परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

नावनोंदणीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT