पुणे

मंगळवेढ्यातील पडक्या इमारती ठरतायेत मोकाट जनावराचे आश्रयस्थान

CD

MGV26B15486
मंगळवेढा ः शहराचे सौंदर्य खराब होण्यास कारणीभूत ठरलेल्या पडक्या इमारतीचे छायाचित्र.

पडक्या इमारती ठरतायेत मोकाट जनावराचे आश्रयस्थान

मंगळवेढा, ता. ४ ः पडक्या अन् धोकादायक इमारती सध्या घुशी व मोकाट कुत्र्याचे आश्रयस्थान बनल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव यामुळे धोकादायक बनला आहे. त्यामुळे पडक्या घराचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
शहरामध्ये २०० पेक्षा अधिक इमारती पडक्या अवस्थेत आहेत. या पडक्या इमारतीमध्ये कुत्र्यांना नवीन पिले जन्म घालण्यास जागा उपलब्ध होते. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांचा चावा घेतला आहे. वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पडक्या इमारतीमध्ये घुशी, उंदीर, डास, साप यांना निवारा मिळाल्यामुळे शहरांमध्ये त्यांचे प्रमाण वाढलेले पाहावयास मिळते.
गटारीच्या शेजारी पडकी इमारत असल्यामुळे दगडे, माती व कचरा गटारीमध्ये पडून गटारी जाम होत आहेत व शहरात सर्वांत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली पाहावयास मिळते. नगरपालिका प्रशासनाने वारंवार स्वच्छता करून देखील पडक्या इमारतीमुळे त्याच्यावर पाणी फिरल्यासारखे होत आहे.
प्रत्येक गल्लीमध्ये पडक्या इमारतीतील जागेत आपल्या घरातील कचरा तेथे नागरिक आणून टाकतात त्यामुळे प्रत्येक पडक्या इमारतीमध्ये उकिरडा तयार झाला आपणास पहावयास मिळतो. यासंदर्भात आज एक दिवस गावासाठी या मोहिमेंतर्गत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रफुल्ल सोमदळे, सतीश दत्तू उपस्थित होते. मात्र पालिकेला पूर्णवेळ कार्यक्षम अधिकारी नसल्यामुळे याबाबतची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब होत आहे.

कोट
- शहराची ओळख संतांची नगरी म्हणून आहे. या ठिकाणी बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना दुर्गंधी, पडक्या घरामुळे निर्माण झालेले मोकाट जनावरांचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी या पडक्या घरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- प्रफुल्ल सोमदळे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - नाना पटोले

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT