Darshan Gund sakal
पुणे

Motivation News : मांजरीच्या दर्शनची सबलेफ्टनंट पदाला गवसणी

प्रबळ इच्छाशक्ती आणि ठरवून केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर मांजरीच्या दर्शन कमलेश गुंड या विद्यार्थ्याने भारतीय नौसेना दलातील सब लेफ्टनंट पदाला गवसणी घातली.

सकाळ वृत्तसेवा

मांजरी - प्रबळ इच्छाशक्ती आणि ठरवून केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर मांजरीच्या दर्शन कमलेश गुंड या विद्यार्थ्याने भारतीय नौसेना दलातील सब लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. एनडीएच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

मूळचे नानगाव (ता. दौंड) येथील असलेले गुंड कुटुंब पूर्वीपासूनच भाजीपाला व्यवसायानिमित्त वाशी भागात होते. २०१५ साली सर्व कुटुंब मांजरीत स्थायिक झाले. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर दर्शनने जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करून त्यात यश मिळवले.

वडील महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत असल्याने दर्शनने सैनिकी सेवेत जावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे दर्शनने त्या दिशेने प्रयत्न केले आणि त्यातच एनडीएसाठी तो पात्र ठरला. कोणतीही खासगी शिकवणी न लावता दर्शनने स्वयंअध्ययनाने हे यश मिळविले. एनडीएमध्ये चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत त्याने अखेर नौसेनेतील सब लेफ्टनंट पदाला गवसणी घातली.

दर्शनची सध्या लोणावळ्यातील आय एन एस शिवाजी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ‘सब लेफ्टनंट’साठी दोन वर्षे तो येथे प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर भारतीय नौसेनेत दाखल होणार आहे.

दर्शनने वेगळे करिअर करावे म्हणून मी त्याला शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धांमध्ये उतरवीत होते. त्याने स्पर्धा परीक्षांचाही अनुभव घेतला. त्याच्याकडून वेगळी अपेक्षा होतीच. आता त्याने मिळविलेल्या यशाने आम्हाला गगन ठेंगणे झाले आहे.

- प्रतिमा गुंड, दर्शनची आई

बारावीनंतर विविध परीक्षा दिल्या. त्यातच एनडीएची संधी समोर आली. वायुसेना किंवा नौसेनेत जाण्याचे ठरविले. हे ध्येय गाठून आज सब लेफ्टनंटपदी झालेल्या नियुक्तीने आई-वडिलांसह घरातील सर्वांनाच अभिमान वाटत आहे. त्यामुळे मलाही आनंद होत आहे.

- दर्शन गुंड, सबलेफ्टनंट नौदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT