Mallika Shivprakasham sakal
पुणे

Manjari News : तब्बल साडेआठ वर्षांनी मल्लिका यांना पुन्हा मिळाले आपले कुटुंब

बेवारस म्हणून "माहेर' संस्थेने केला होता सांभाळ

कृष्णकांत कोबल

मांजरी - मनोरुग्ण अवस्थेत घर सुटलेल्या तामिळनाडू येथील एका महिलेला तब्बल साडेआठ वर्षानंतर आपल्या कुटुंबात परतण्याचे भाग्य मिळाले आहे. बेवारस म्हणून सांभाळ व उपचार करून या महिलेला पुन्हा तिच्या कुटुंबियांचे प्रेम मिळवून देण्याचे काम 'माहेर' संस्थेने केले आहे. मल्लिका शिवप्रकाशम (वय ५९) असे या महिलेचे नाव असून नुकतेच संस्थेने तिला आपल्या मुलांच्या स्वाधीन केले आहे.

माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर ल्युसी कुरियन यांना साडेआठ वर्षांपूर्वी शिक्रापूर पाबळ चौकात ही महिला मनोरुग्ण व बेवारस अवस्थेत दिसली होती. तिचे कपडे मळलेले होते. शरीराची दुर्गंधी सुटली होती. केवळ तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. त्यावेळी तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला काहीही समजत नव्हते.

सिस्टर कुरियन यांनी तिला आधार देत आपल्या मांजरी खुर्द येथील माहेरच्या 'सुखसंध्या' प्रकल्पामध्ये दाखल केले. तिच्यावर औषधोपचार, समुपदेशन व विविध थेरपीद्वारे उपचार सुरू केले. ही महिला कोठून आली, तिची भाषा कोणती, हे काहीच माहीत नसल्याने तिच्याशी संवाद साधने अवघड होत होते. मिळालेल्या उपचाराने हळूहळू तिची प्रकृती सुधारत गेली. काही महिन्यांपूर्वी तिला आठवू लागले, ती बोलू लागली. कामात मदत करू लागली. त्यातून तिला तमिळ भाषा येत असल्याचे समजले.

संस्थेच्या कार्यकर्त्या शर्ली अँथोनी यांना तमिळ भाषा अवगत असल्याने त्या त्यांच्याशी संवाद करू लागल्या. दररोज त्यांचं संभाषण होत होते. त्यातून त्यांच्या स्मृती हळू हळू जागवू लागल्याचे जाणवत होते. काही दिवसांनी त्यांना गतकाळही आठवू लागला. आपले घर, गावचा पत्ताही त्या सांगू लागल्या. त्यामुळे संस्थेने त्यांच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली.

दीड महिन्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वेदमलिकम व राणी यांच्या सहकार्याने तामिळनाडू येथील त्यांच्या घराचा पत्ता मिळाला. पोलिसांनी त्या ठिकाणी माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याबाबत माहिती दिली. दरम्यान, मुलगा मुरली व मंगेश, जावई गणेशन त्यांना घेण्यासाठी मांजरी येथे आले. आई व मुलांची भेट होतात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

'तब्बल साडेआठ वर्षांनी आमची आई मिळवून देऊन माहेरने आमच्या संपूर्ण कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे,' अशी भावना मुरली व मंगेश शिवप्रकाशम यांनी व्यक्त केली.

तर, 'साडेआठ वर्षे माझा सांभाळ व उपचार करून पुन्हा कुटुंबाचे प्रेम मिळवून देण्याचे काम माहेरने 'सुखसंध्या'मध्ये केले आहे. सिस्टर ल्युसी कुरियन, शर्ली अँथोनी, सचिन पिसे यांच्यासह सर्वांनी मला पुन्हा नवे जीवन दिले आहे. मी कायम त्यांच्या ऋणात व संपर्कात राहील, अशी भावना मल्लिका यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: इंडिगो विमानाजवळ बॅगा टाकून बसलेल्या प्रवाशांचा 'तो' फोटो नेमका कधीचा? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Mumbai News: मुंबईत पहिल्यांदाच ३ किलोमीटरचा अंडरग्राउंड पादचारी बोगदा! कुठून कुठे होणार? जाणून घ्या एमएमआरसीची भविष्यदर्शी योजना...

Flight Ticket Pune Mumbai : पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट ६१ हजारांवर, तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले

जर तिचं लग्न माझ्यासोबत झालं असतं तर... माधुरीसोबत लग्न तोडण्यावर सुरेश वाडकरांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Soundatti Yatra : मार्गशीर्ष पौर्णिमेला सौंदत्ती डोंगरावर भाविकांची लाखोंची मांदियाळी; पालखी सोहळ्यात ‘उदं गं आई उदं’च्या जयघोषाने डोंगर दणाणला

SCROLL FOR NEXT