Railway
Railway sakal
पुणे

मनमाड-भुसावळला जाणाऱ्या रेल्वे रद्द

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे.

पुणे - भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. त्यामुळे २४ ते २९ जूनदरम्यान विविध रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे स्थानकावरून जाणाऱ्या व येणाऱ्या १५ रेल्वेचा समावेश आहे.

पुणे-जसीडिह एक्स्प्रेस, पुणे-काजीपेट एक्स्प्रेस (२४ जून), पुणे-अजनी एक्स्प्रेस (२५ जून), हडपसर-नांदेड एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, पुणे-दरभंगा एक्स्प्रेस (२७ जून), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (२८ जून) या गाड्या रद्द केल्या आहेत.

पुण्याला येणाऱ्या गाड्या

२४ ते २७ जून दरम्यान निजामाबाद येथून सुटणारी गाड्या. यात निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस, अजनी-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-हडपसर एक्स्प्रेस, जसीडिह-पुणे एक्स्प्रेस, काजीपेट-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस तर २९ जूनला दरभंगा-पुणे आदी रेल्वे रद्द केल्या आहेत.

या गाड्या उशिराने धावणार

२४ जून रोजी वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन अंकाई स्थानकावरून दीड तास उशिरा, हजरत निजामुद्दीन -वास्को-द-गामा नांदगाव रेल्वे स्थानकावरून ४० मिनिटे उशिरा, ११०७८ जम्मूतावी- पुणे हिवाहल रेल्वे स्थानकावरून दोन तास उशिरा, २५ जून रोजी वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन अंकाई रेल्वे स्थानकावरून १ तास उशिराने धावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT