पुणे

मनमोहन सिंग यांच्यामुळे भारताचा आर्थिक विकास अँजेला मर्केल यांचे गौरवोद्गगार

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२७ ः ‘‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या सुधारणा कार्यक्रमांमुळे भारत गेल्या ३० वर्षांपासून आर्थिक विकासाच्या वाटेवर असल्याचे गौरवोद्गार जर्मनीच्या माजी चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी काढले. डॉ. मनमोहन सिंग स्मृती व्याख्यान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असतानाही भारताने मागील काही वर्षांत पाच टक्क्यांपेक्षा जास्त विकास दर साध्य केला असल्याचे मर्केल यांनी नमूद केले. आर्थिक विकास साध्य करण्याची आणि पुढे जाण्याची जबरदस्त ताकद भारतात असल्याचे सांगत मर्केल म्हणाल्या की, १९९१ ते १९९६ या काळात डॉ. मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. भारत त्यावेळी गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत होता. डॉ. सिंग यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. परदेशी चलनाचे धोरण त्यांनी सोपे केले. प्रशासकीय विलंब आणि दिरंगाई संपवली तसेच देशाची बाजारपेठ खुली केली. या प्रयत्नांमुळे आर्थिक स्थिरता तर आलीच पण पुढील ३० वर्षांच्या काळात भारताला आर्थिक प्रगती करता आली.
भारत आणि युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार कराराचे मर्केल यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, की युरोपीय महासंघ ही जगातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे तर भारतीय लोकसंख्येत युवकांचे प्रमाण जास्त आहे. भारताला निश्चितपणे याचा चांगला फायदा होईल. सध्याचे जग संरक्षणवादाकडे धावत आहे, अशावेळी आंतरराष्ट्रीय सहयोग ही अपरिहार्य बाब बनली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, आयात शुल्काचे राजकारण आणि लोकशाही संस्थांवरील वाढता दबाव अशा बाबींशी सध्या जग झुंजत आहे. आंतरराष्ट्रीय सहयोगाची जुनी व्यवस्था आता धोक्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लोकशाहीची खरी परीक्षा ही घटनेत नसते तर वास्तवात लोकशाही कशा प्रकारे काम करते त्यात असते, असे विधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये २००५ मध्ये केले होते. त्या विधानाची आज मला आठवण येते, असे मर्केल यांनी सांगितले. लोकशाही मूल्ये आणि मानवीय अधिकारांशी कधीही तडजोड केली जाऊ नये, अशी टिप्पणीही त्यांनी केली. कार्यक्रमास डॉ. सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पी. चिदंबरम, एन. एन. वोहरा आदी उपस्थित होते.

क्योटो करारानंतर ‘कार्बन उत्सर्जन-२’ स्वीकारण्यास भारताने नकार दिला होता. डॉ. सिंग यांच्या त्या निर्णयाशी आपण सहमत नव्हतो.
अँजेला मर्केल, माजी चॅन्सलर, जर्मनी

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

Video Viral: ''पागल झालास.. पप्पाला घेऊन आलास'', गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप, पठ्ठ्या बापालाच घेऊन गेला, मग तिने झापझाप झापलं

Artificial Flowers Ban: सजावटीसाठी आता कृत्रिम फुलांचा वापर केलात कारवाई होणार! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

Pakistan Semi Final Scenario: पाकड्यांना उपांत्य फेरीचं गणित वाटतं तेवढं सोपं नाही... १५५ धावांनी विजय ते ४.२ षटकांत १०० धावांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT