पुणे

मनोहर भोसले याची पोलिस कोठडी तीन दिवसांनी वाढली

अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी झाली होती अटक

कल्याण पाचांगणे, माळेगाव

माळेगाव : अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अटक केलेल्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याला आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ (ता.१९) झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. भोसले याची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला आज बारामती न्यायालयात हाजर केले होते.

यावेळी न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दरम्यान, बाळूमामांचा वशंज असल्याचे सांगत मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले याने कर्करोगावर अघोरी इलाज केल्याची फिर्याद शशिकांत खरात यांनी दिली होती. त्यावरून मनोहर भोसले, नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे या तिघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी संशयित आरोपी मनोहरमामाला लोणंद( जिल्हा सातारा) नजिकच्या सालपे येथील फार्म हाऊस मधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मनोहरमामाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. तालुका पोलिसांनी मनोहरमामाची एक्सयुव्ही कार जप्त केली आहे.

या प्रकरणातील नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे हे दोघे अद्यापपर्यंत फरार आहेत. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी व त्यांच्याकडून अधिक ची माहिती मिळण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक महेश ढवाणयांनी मनोहर भोसले याला आणखी पोलीस कोठडीत देण्याची मागणी केली असता न्यायालयाने ती मान्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT