manoj gyanchandani 
पुणे

स्वतःमधील नायकाचा शोध घ्या! - मनोज ग्यानचंदानी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. मात्र कायम नव्याने सुरुवात करण्याची हिंमत दाखवणे गरजेचे आहे. प्रत्येक तरुणाने स्वत:मधील नायकाचा शोध घ्यावा. तो नायक स्वप्न सत्यात उतरवण्यात नक्की मदत करेल,’’ असे मत ‘लियान ग्लोबल प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज ग्यानचंदानी यांनी व्यक्त केले.
लियान ग्लोबलचा पादत्राणांचा ब्रॅंड असलेल्या ‘रेड चीफ’च्या २३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीविषयी ते बोलत होते. 

ग्यानचंदानी म्हणाले, ‘‘भारतातील आघाडीचा ब्रॅंड असलेल्या ‘रेड चीफ’ने काळाची पावले ओळखत २३ वर्षांपेक्षा अधिक काळ सर्वोत्तम गुणवत्ता, सुविधा आणि स्टाईल जपली आहे. कारण उत्तम गुणवत्तेच्या जोरावर बाजारातील स्थान भक्कम होण्यास मदत झाली आहे. सध्याच्या तरुणांपासून ते पन्नाशीत पदार्पण केलेल्या सर्वांचा आत्मविश्वास आणि स्टाईल जपणारा ‘ब्रॅंड’ म्हणून आज ओळख आहे. ज्यांना त्यांची स्वप्नं जगायची आहेत, जे स्वत:मध्ये सातत्याने नव्याचा शोध घेत आहेत अशांसाठी कायमच नवीन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’’

‘यूथ आयकॉन’ असलेला विकी कौशल ‘रेड चीफ’चा ब्रॅंड ॲम्बेसेडर आहे. सध्या ‘खेल गये चीफ’ ही  मोहीम (कॅम्पेन) सर्वत्र सुरू असून, यात तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे सांगून ग्यानचंदानी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पादत्राणांच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे चांगल्या ब्रॅंडच्या शोधात ग्राहक आहेत. इंटरनेटमुळे फॅशन आता अभूतपूर्व गतीने देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे. त्यामुळे टिअर २, टिअर ३ बाजारपेठांमधील ग्राहकदेखील फॅशनच्या बाबतीत जागरूक आहेत. मात्र भारतीय ग्राहक उत्पादनांच्या किमतीच्या बाबतीत कमालीचे संवेदनशील असतात. त्यांना माफक दरात उत्तम दर्जा हवा असतो. अनेक ब्रॅंड नजीकच्या फायद्यासाठी उत्पादनाच्या दर्जात तडजोड करण्याची चूक करतात.

कमी दर्जाच्या वस्तू स्वस्तात देणाऱ्या ब्रॅंडमुळे जरी आव्हान उभे राहिले असले, तरी प्रचंड ग्राहकाभिमुकता आणि गुणवत्तेबाबत दक्ष असल्यामुळे ‘रेड चीफ’ सातत्याने सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन देत आहे. प्रत्येक व्यावसायिकाने उत्तम दर्जा देण्यासाठी आग्रही असणे गरजेचे आहे.

‘‘तरुणांनी कायम स्वतःकडील सर्वोत्तम आहे ते दिले पाहिजे. जेणेकरून आयुष्यात यशस्वी होण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही,’’ असेही ग्यानचंदानी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT