Manoj Jarange Esakal
पुणे

Manoj Jarange: "...तर लायकी नसलेल्याच्या हाताखाली कामाची वेळ आली नसती"; खराडीतल्या सभेत जरांगेंचं विधान

मराठा समाजानं कधीही जातीयवाद केला नाही असंही जरांगेंची पुण्यातील खराडी इथंल्या सभेत म्हटलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुण्यातील खराडी इथं सभा पार पडली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे? हे सांगताना काही अशी विधानं केली आहेत ज्यामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरक्षण आधीच मिळालं असतं तर ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती, असं जरांगेंनी म्हटलं आहे. (Manoj Jarange controvarsal statement during Kharadi rally for Maratha Reservation)

ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखील काम

जरांगे म्हणाले, ९५ टक्के पडले तरी, मराठ्याचं लेकरु घरी राहिलं, त्याला नोकरी मिळाली नाही. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळालं असतं तर, मराठा जात जगात एक नंबरवर राहिली असती. ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती. आरक्षणापायी आमच्या मुलांचे मुडदे पडायला लागले आहेत, त्यामुळं आता सरकारला सुट्टी नाही. (Marathi Tajya Batmya)

बेकायदापद्धतीनं पोटजाती घुसवल्या

कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात ५० टक्के आरक्षण दिलं पाहिजे. मंडल आयोगानं ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिलं, म्हणजे ओबीसी २८ टक्के आहेत. हे आम्ही नाही ठरवलं ते मंडल आयोगानं ठरवलं. सन १९९४ मध्ये हे आरक्षण ३० टक्के झालं. म्हणजे ओबीसी ६० टक्के झालं. यात बेकायदा पद्धतीनं पोटजाती घुसवण्यात आल्या. (Latest Marathi News)

मराठ्यांनी कधीच जातीयवाद नाही केला - जरांगे

माझ्या मराठा समाजासमोर कोणत्याही जातीचा माणूस आला तरी त्याच्यातली माणुसकी जिवंत व्हायची. त्यानं कधीच कोणाची जात शोधली नाही. जे आपल्या हातात आणि पदरात आहे ते मोठ्या मनानं देण्याचं काम माझ्या बापजाद्यांनी केलं. प्रत्येकाच्या सुखादुखात माझा बापजादा धावून गेला. कोणावरही अन्याय झाला पाहिजे हे त्यांनी बघितलं. स्वतःच्या लेकराला एक वेळाचं दिलं नाही पण दुसऱ्याचं लेकरु उघड्यावर पडू दिलं नाही. त्याच्यावर मायेचं छत्र पडू दिलं नाही. जात ही माझ्या बापजाद्या मराठ्यांना कधी शिवली नाही.

स्वतःच्या हक्काचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. कधी समाज असं म्हटला नाही की माझ्या लेकराच्या डोळ्यातही कधी पाणी येईल त्यामुळं तुम्ही घेऊ नका असं कधी म्हटलं नाही. माझ्या लेकरांना वेळ आल्यावर धाऊन येतील यासाठी मराठ्यांनी सर्वांना मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT