पुणे, ता. ७ ः ‘‘मनोज जरांगे यांनी सातत्याने राजकीय मर्यादा ओलांडून सरकारवर दबाव आणण्याची भाषा करण्यापेक्षा आधी एका ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावे. सरकारनेही त्यांच्या दबावाला बळी न पडता ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावी,’’ अशी भूमिका ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी मांडली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका लाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘‘ओबीसींच्या आरक्षणासाठी १६ तरुणांनी आत्महत्या केल्या; मात्र त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप अपेक्षित मदत मिळालेली नाही. बोगस कुणबी प्रमाणपत्रांद्वारे ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण होत असताना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकही होत नाही,’’ असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी २५० जातींना आरक्षणाच्या बाहेर काढण्याची भाषा करण्याऐवजी आधी एका जातीबाबत असे करून दाखवावे. जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांवर दबाव आणण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणीही ससाणे आणि ढोले-पाटील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.