मनोज जरांगे-पाटील
कऱ्हाड दौऱ्यावर
कऱ्हाड, ता. ५ ः मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी (ता. ११) मसूर व गुरुवारी (ता. १२) आटके (ता. कऱ्हाड) येथे जाहीर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी ते समाजबांधवांशी संवाद साधून नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेणे, शैक्षणिक व रोजगारासंदर्भातील प्रश्न समजून घेणे, आरक्षणाशी संबंधित दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणी, तसेच समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने शासकीय स्तरावर भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेणे हा आहे. संबंधित विषयांवर मार्गदर्शन करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील सर्व बंधू-भगिनींनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
PNE26W40299
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.