Manoj Jarange Patil esakal
पुणे

Manoj Jarange : जरांगेंचा मोर्चा पुण्यात धडकणार! विद्यापीठ चौकातून होणार मार्गस्थ, 'या' मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता

Maratha Reservation News :

Kiran Mahanavar

Maratha Reservation Rally in Pune : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा बुधवारी (ता. २४) सकाळी पुणे शहरात धडकणार आहे. वाघोली येथून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोर्चास प्रारंभ होणार असून, येरवडा शास्त्रीनगरमार्गे संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, कृषी महाविद्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे सांगवीकडे मार्गस्थ होणार आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. २०) हजारो मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत.

वाघोली परिसरातील चोखीदाणी येथे मंगळवारी रात्री मुक्कामानंतर बुधवारी सकाळी जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ होईल. येरवडा शास्त्रीनगरमार्गे ही पदयात्रा संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, कृषी महाविद्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे सांगवीकडे जाणार आहे. हे अंतर पायी पार करण्यासाठी साधारण पाच ते सहा तासांचा कालावधी लागणार आहे. या मार्गावर आणि परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सांगवी येथून हा मोर्चा पिंपरी चिंचवड, देहू रस्ता, तळेगावमार्गे लोणावळ्याच्या दिशेने जाईल. रात्री लोणावळा येथे जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.

आरक्षण मोर्चाचा शहरातील मार्ग -

वाघोली- चोखीदाणी ते खराडी जकात नाका, नगर रस्त्याने खराडी बायपास, चंदननगर, विमाननगर, वडगाव शेरी हयात हॉटेल, येरवडा, शास्त्रीनगर, पर्णकुटी गुंजन चौक, बंडगार्डनमार्गे शिवाजीनगर, संचेती चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, औंधमार्गे सांगवी फाटा. (येरवड्यापासून मोर्चाच्या मार्गात अचानक बदल झाल्यास खडकी, दापोडीमार्गे सांगवी असा मार्ग राहील). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT