Lawyers Sakal
पुणे

Shivajinagar News : जरांगेंना बदनाम करणारे राणेंचे कार्यकर्ते; जरांगेंच्या विरोधात बोलण्यासाठी फोन येत आसल्याची वकिलांची माहिती

'मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता काही लोकांना सहन होईना, त्यामुळेच पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीनगर - 'मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता काही लोकांना सहन होईना, त्यामुळेच पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. जरांगे यांनी समाजासाठी मोठा त्याग केला असुन त्या माणसाचे योगदान विसरता येणार नाही. सत्ताधारी पक्षातील राजकीय मंडळी काही लोकांना हाताशी धरून पाटील यांची बदनामी करत आहेत.

बीड शहरात चार तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर खोटे आरोप केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कटुंबातील सदस्यांचे ते कार्यकर्ते असुन सोशल मीडीयावर देखील त्यांचे फोटो दिसून येतील.' अशी माहिती जरांगे यांच्या शिवबा संघटनेतील बकील अॅड. वाजीद खान बीडकर व अॅड. गणेश मस्के पाटील यांनी दिली.

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कोर्टात मारहाण केलेल्या तरूणांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांनी काही मदत न केल्याचे आरोप केले होते, या आरोपावरून जरांगे यांच्या शिवबा संघटनेतील वकीलांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले.

अॅड. मस्के पुढे बोलताना म्हणाले, '२०१७ मध्ये कोपर्डी येथे एका मुलीवर आत्याचार झाला त्या आरोपींना कोर्टाच्या बाहेर मारण्यासाठी जरांगे जाणार होते, परंतु इतर सदस्यांनी जावू दिले नाही. मात्र या चार तरूणांनी जास्त बळजबरी केली आणि त्यानी आरोपींना कोर्टाच्या बाहेर मारहाण केली. या तरूणांना जोपर्यंत जामीन मिळाला नाही तोपर्यंत जरांगे घरी गेले नाहीत.

याच तरुणांनी तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचे कौतुक केले होते आणि आता अचानक भूमिका बदलली. काही लोकांचे मन दुखावले की तो लगेच जरांगे यांच्या विरोधात बोलतो. जरांगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार यांच्याशी काही सबंध नाहीत.

जरांगे यांच्या विरोधात ज्या तरुणांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना झेल मधून बाहेर काढण्यासाठी आम्ही व जरांगे यांनी दिवसरात्र कष्ट घेतले. जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी आम्हाला अनेक फोन येत असून वेळ आल्यावर पुराव्यासह ते बाहेर काढू.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT