Manoj Jarange Patil Sakal
पुणे

Manoj Jarange Patil : आमचा विरोध नेत्यांना, सर्वसामान्य ओबीसींना कधीच दुखावलेले नाही - मनोज जरांगे पाटील

आपल्याला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे. मराठा समाज यापूर्वीही आणि आताही शांत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : "जातीविषयक मी कधीही बोलत नाही, सर्वसामान्य ओबीसी बांधवांना कधीही दुखावलेले नाही, यापुढेही दुखावणार नाही. नेते आम्हाला विरोध करतात, म्हणून आम्ही त्या नेत्यांना विरोध करतो.

गावखेड्यात ओबीसी व मराठा बांधवांना एकत्र रहावे लागते, त्यांच्यात दुही पसरेल असे कोणी वागू नये' अशा शब्दात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी विरोधकांवर टीका केली.

जरांगे पाटील शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बीडमधील वाढत्या जातीयवादाबद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, "मराठा व ओबीसी या दोन्ही समाजाने शांत रहावे, असे माझे त्यांना आवाहन आहे.

त्यांनीही आवाहन केले पाहीजे. आपल्याला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे. मराठा समाज यापूर्वीही आणि आताही शांत आहे. मला जातीयवाद मान्य नाही. जातीजातीमध्ये द्वेष पसरविण्याचे काम नेत्यांकडून केले जात आहे.

त्या नेत्यांच्या विरोधात आम्ही बोलत आहोत. नेत्यांना पाडा असे कोणीही म्हणू शकतो, त्यामध्ये जातीयवाद आला कुठे ? नेतेही विरोधी उमेदवाराला पाडा असे म्हणतात, मग तिथे जातीयवाद असतो का ?'

राज्य सरकारने विविध योजनांसाठी 26 कोटी रूपये मंजूर केले आहेत, त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर जरांगे पाटील म्हणाले, "सरकारने विविध योजनांसाठी दिलेल्या निधीचा काहीही फायदा होणार नाही. मराठा, मुस्लिम, दलितांसह बारा बलुतेदारांमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे.

ती लाट थंड करण्यासाठी आणि त्यांची सकारात्मक बाजु दाखविण्यासाठी निधी, जाहिराती देण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे. पण हे सर्व करण्यापेक्षा मराठा व कुणबी हे एकच आहेत हे सिद्ध झाले आहे, मग मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यायला पाहीजे.हीच आमची मागणी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT