Pune: मनोज जरांगे-पाटील दोन ऑगस्टला होणार न्यायालयात हजर Esakal
पुणे

Manoj Jarange Patil: जरांगे-पाटील 2 ऑगस्टला होणार न्यायालयात हजर, नेमकं काय आहे प्रकरण?

Manoj Jarange Patil Will Appear In Pune Court: वकिलांची न्यायालयात माहिती, नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

Latest Marathi Crime Update: नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या मागील सुनावणीला हजर न राहिलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील दोन ऑगस्टला असलेल्या पुढील तारखेला न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी बुधवारी (ता. २४) न्यायालयास दिली.

सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी मंगळवारी (ता. २३) अटक वॉरंट काढले आहे. हे वॉरंट रद्द करण्याची विनंती त्यांचे वकील संतोष खामकर यांनी न्यायालयास केली.

तबीयत बरी नसल्याने ते सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. मात्र पुढील सुनावणीला ते हजर राहतील, असा युक्तिवाद ॲड. खामकर यांनी केली. मात्र सुनावणीसाठी आरोपींचे हजर राहणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती.

त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात न्यायालयात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.

त्यानंतर जरांगे मे अखेरीस न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जरांगे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर वॉरंट रद्द केले होते. परंतु, त्यानंतरही जरांगे सुनावणीला गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neelotpal Basu Kolhapur SP : गडचिरोली, मालेगाव, मुंबई, नागपूरचा अनुभव असलेले नीलोत्पल बसू कोल्हापूरचे नवे एसपी, कडक शिस्तीचा स्वभाव चालणार का?

IT Company Assault : निदा खानला दिलासा नाहीच, अटकेची टांगती तलवार; गर्भवती-नोकरी गमावल्याने तणावात असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद, 27 ला सुनावणी होणार

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री दादा भुसे यांची नाशिकमध्ये आढावा बैठक सुरू

Employees Strike: १७ लाख कर्मचाऱ्यांचा संप! सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालये ठप्प होणार; नेमकं कारण काय?

Shegaon Temple: रात्री ४ वाजता ट्रेन, अडचण पाहून ३ लोकांसाठी पहाटे ३ वाजता सोडली ५५ सीटर बस ! सेवा-श्रद्धेचं खरं उदाहरण म्हणजे 'शेगाव'

SCROLL FOR NEXT