corona.jpg 
पुणे

अंत्यविधीला उपस्थित असलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग

रमेश वत्रे

केडगाव ः चौफुला ( ता.दौंड) येथील एका अंत्यविधीला उपस्थित असलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. ही वृद्ध महिला अंत्यविधी व अस्थिविसर्जनला उपस्थित होती. अंत्यविधीला गर्दी होणार हे माहित असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चौफुला येथील सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तुकाराम धायगुडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीला काल ( ता. ११ ) ५०० पेक्षा जास्त नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. आज अस्थिवर्सजनला तेवढीच गर्दी होती. या दोन्ही दिवशी गर्दी होणार हे माहित असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. चौफुल्यात कोरोनाचे रूग्ण सापडले असताना ग्रामपंचायतीने किमान सॅनिटायझरची तरी व्यवस्था करायला पाहिजे होती. अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

चौफुला येथे आषाढी एकादशीच्या दिवशी एका शेतक-याचा कोरोना सदृश लक्षणाने मृत्यू झाला. मात्र या शेतक-याची कोरोना चाचणी न होताच त्यांचा अंत्यविधी झाला होता. त्यानंतर त्याचा मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. हे कुटुंब होम क्वारंटाईन असताना त्यातील वृद्ध महिला धायगुडे यांच्या अंत्यविधी व अस्थिविसर्जनला उपस्थित होती. या कुटुंबातील पाच सदस्यांचा काल  दुस-यांदा स्वॅाब घ्यायचा होता. त्यांची नावनोंदणी यवत ग्रामीण रूग्णलायात करण्यात आली होती. ही महिला स्वाब द्यायला न जाता अंत्यविधीला गेली. आरोग्य विभागाने महिलेला अंत्यविधीला जाऊ नका असे वारंवार सांगूनही ही महिला जवळचे नातेवाईक असल्याने अंत्यविधीला गेली. आज त्यांच्या कुटुंबातील महिला वगळता चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे चौफुला ग्रामस्थांची काळजी वाढली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चौफुला हे बोरीपार्धी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. लॅाकडाऊन सुरू झाल्यापासून ग्रामपंचायतीने एकदा फवारणी  व एकदा धुरळणी केली आहे. तर प्रशासन म्हणते की चार वेळा फवारणी केली आहे. चौफुल्यातील स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामस्थांचा रोष आहे. सदस्य सोमनाथ गडधे म्हणाले, आम्ही मांडलेल्या तक्रारी व सुचनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पंचायतीच्या सहा वॅार्डांपैकी चौफुल्यातील दोनच वॅार्डामधून ग्रामपंचायतीला  ७० टक्के उत्पन्न मिळते. तरीही चौफुला ग्रामस्थांना सोयीसुविधा देताना दुर्लक्ष होत आहे. ग्रामसेवक रावते यांनी याबाबत ग्रामपंचायतीची बैठक बोलविली जाईल असे नमूद केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT