पुणे

बारामतीच्या अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचा 'पढेगा भारत'सोबत सामंजस्य करार

सकाळवृत्तसेवा

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल ऑनलाईन शिक्षण पद्धतीने आधुनिक कोर्सेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील 'अनेकान्त एज्युकेशन सोसायटी'ने पढेगा भारत यांच्याशी नुकताच परस्पर सामंजस्य करार केला.

हेल्दीग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान संगत विविध कोर्सेस तसेच कौशल्य विकासाचे अनेक कोर्सेस व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. सदर ऑनलाईन प्लॅटफॉर्मची सुविधा टी. सी. कॉलेज तसेच परिसरातील अन्य हायस्कूल व महाविद्यालयांना उपलब्ध व्हावी, यासाठी हा करार करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मिलिंद शहा (वाघोलीकर) यांनी सांगितले. 'पढेगा भारत'चे संस्थापक व माजी खासदार अमर साबळे, व्यवस्थापकीय संचालिका वेणू साबळे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिझनेस इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग (IOT) मशिन लर्निंग, पायथॉन, सॅप मोड्यूल्स, फॉरेन लँग्वेजेस, ऍग्रो बिझनेस मॅनेजमेंट आदी आधुनिक तंत्रज्ञानसंगत कोर्सेस याशिवाय रोजगाराभिमुख फार्मा इंडस्ट्री कोर्सेस, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कोर्स तसेच ज्ञानरचना वादावर व नवनिर्मिती मूल्यांवर आधारित इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची निर्मिती 'पढेगा भारत'ने केली आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आधुनिक तंत्रज्ञान सुसंगत, तंत्रकौशल्यावर आधारित ज्ञानरचनावाद व नवनिर्मिती मूल्यांवर आधारित उच्च दर्जाचे शिक्षण व्हर्चुअल ऑनलाईन  तंत्रज्ञानाने सर्वदूर आणि माफक दरात पोहोचविण्याचा आमचा हा संकल्प असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव जवाहर शहा (वाघोलीकर) यांनी केले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयाबरोबरच अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल तसेच आसपासच्या परिसरातील अन्य शाळांतील विद्यार्थ्यांना देखील या उपक्रमाचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

SCROLL FOR NEXT