Shoulder 
पुणे

लॉकडाउनमध्ये जिम बंद असल्याने अनेकांनी घरातच व्यायाम केला; पण खांद्याच्या दुखापती वाढल्याचे आले समोर

योगिराज प्रभुणे

पुणे - लॉकडाउनमध्ये व्यायामशाळा बंद असल्याने बहुतांश पुणेकरांनी घरच्या घरी जोर-बैठकांचा व्यायाम करून आपला फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न केला खरा..; पण त्या व्यायामांना शास्त्रीय जोड नव्हती. त्यातून खांद्याची दुखणी वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हातावर भार येऊन पडणे, वाहन अपघात, खेळताना इजा होणे, इलेक्‍ट्रिक शॉक बसणे किंवा फिट येणे या आणि अशाच काही कारणांमुळे आतापर्यंत खांदा निखळत असल्याचे तज्ज्ञांना माहिती होते. पण, गेल्या काही दिवसांमध्ये अशास्त्रीय व्यायामाचा दुष्परिणाम म्हणून खांद्याच्या दुखापती वाढल्याचे नव्याने समोर येत आहे.लॉकडाउनमध्ये जिम बंद असल्याने अनेकांनी घरातच जोर-बैठका, सूर्यनमस्कार असे व्यायाम केले. पण, ते करताना त्यात शास्त्रशुद्धता नव्हती. त्यामुळे खांद्याची जाळी खूप ताणली जाते. त्यातून ती शिथिल होते. अशा स्थितीत हात डोक्‍याच्यावर घेतल्यास खांदा निखळण्याचा धोका असतो. झोपेतही अशा प्रकारे खांदे निखळण्याची काही उदाहरणे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

ज्युपिटर रुग्णालयामधील अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद जाधव म्हणाले, ‘‘खांदा निखळताना खांद्याच्या सॉकेटला, बॉलला व जाळीला मार लागतो. उथळ सॉकेटला खोल करणारी विशेष स्नायूंची रिंग उखडून सॉकेटपासून दूर जाऊ शकते. या इजेला ‘बॅंकार्ट लिझन’ म्हणतात. अनेकदा या उखडलेल्या रिंगसोबत सॉकेटच्या हाडाचा तुकडा असू शकतो. अशा इजेमुळे सॉकेटची रुंदी कमी होते. खांदा निखळताना सॉकेटला धडकून बॉल बाहेर येताना, बॉललाही इजा होते व खड्डा पडू शकतो. याला हिल सॅक्‍स लिझन असे संबोधले जाते. खांद्याची जाळीही फाटते.’

खांद्याच्या इजेवरील उपचार 
सॉकेटची स्नायूंची रिंग उखडली असेल तर ती पुन्हा योग्य ठिकाणी जोडणारी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे बॉल निखळू नये म्हणून अडथळा निर्माण होतो. बहुसंख्य रुग्णांना अतिरिक्त शस्त्रक्रिया कराव्या लागतात. लॅटर्जेट शस्त्रक्रियेमध्ये सॉकेटच्या झिजलेल्या भागात खांद्याच्या समोरच्या हाडाचा एक तुकडा व त्याला जोडले असणारे स्नायू सॉकेटला दोन स्क्रूच्या साहाय्याने जोडला जातो. त्यामुळे सॉकेटची रुंदी वाढते व समोरच्या बाजूला मजबूत स्नायूचा आधार मिळतो. या शस्त्रक्रियेमुळे खांदा चांगल्या पद्धतीने स्थिरावतो. 

खेळाडू सर्व प्रकारच्या खेळांमध्ये भाग घेऊ शकतात. काही रुग्णांमध्ये बॉलला मोठा खड्डा पडल्यामुळे खांदा निखळण्याची शक्‍यता वाढते, अशा रुग्णांसाठी रेम्पलीसाज नावाची शस्त्रक्रिया करावी लागते. खांद्याचा एक अंतर्गत स्नायू या खड्ड्यामध्ये जोडून त्याला भरण्यात येते. त्यामुळे सांधा निखळत नाही.

का लागते शस्त्रक्रिया?
वारंवार निखळणाऱ्या खांद्याला स्थिर करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असते. अशा शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. आर्थ्रोस्कोपिक सर्जरीचे प्रमुख फायदे म्हणजे रुग्ण लवकर बरा होतो, कमी वेदना आणि सूज कमी होते. 

वारंवार निखळणाऱ्या खांद्याच्या रुग्णांना योग्य सल्ला व उपचार मिळाल्यास त्यांची खांद्याची समस्या सुटू शकते. ते कार्यक्षम जीवनशैली जगू शकतात. अशा रुग्णांची योग्य माहिती घेतली जाते व त्यांची काळजीपूर्वक तपासणी करण्यात येते.
- डॉ. आनंद जाधव, अस्थिरोग शल्यचिकित्सक, ज्युपिटर रुग्णालय

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT