पुणे

लढा कोरोनाचा, हात मदतीचा 

दत्ता म्हसकर

जुन्नर : येथील डॉक्टर महिला प्रतिष्ठानच्या वतीने बल्लाळवाडी ता. जुन्नर येथील राजाराम पाटील वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. अक्षयतृतीयेला येथील वृद्धांना आंबरसाचे जेवण देण्यात आले तसेच अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.

डॉ. श्रद्धा भिडे यांनी कोरोना व्हायरसबाबत माहिती सांगताना ज्येष्ठांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, कोरोना विषाणूंमुळे देशावर संकट आले आहे. हा श्वसनाचा आजार असून, तो संसर्गजन्य आहे. यामुळे शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. तसेच मास्कचा वापर आवश्यक आहे, असे सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तनिष्का गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी आनंदी व समाधानी आयुष्याच्या महत्वाच्या टिप्स दिल्या. हा वृद्धाश्रम नसून तुमचेच घर आहे असे समजून एकमेकांशी प्रेमाने व आपुलकीने वागावे असा सल्ला दिला. डॉ. नैना पानसरे यांनी आरोग्य व आहार कसा असावा याविषयी ज्येष्ठांना मार्गदर्शन केले. सकाळी योगा संध्याकाळी चालणे असा झेपेल असा व्यायाम करावा. जे जेवण असेल ते आनंदाने खावे, येथील कामास जमल्यास हातभार लाववा असे सूचित केले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या उपक्रमासाठी अंजली कुलकर्णी, डॉ.माधुरी निरगुडकर, डॉ.सुनिता ढोबळे, डॉ. सुनिता नायकोडी, ज्योती कुलकर्णी, हेमा एखंडे, रूबिना मोकाशी, डॉ.शुभांगी वलवणकर, रजनी डुंबरे, डॉ.वैशाली गायकवाड, डॉ.मोनाली शिंगोटे आदींचे सहकार्य लाभले. फकिर आत्तार यांनी सूत्रसंचलन केले व आभार व्यवस्थापक मनीषा खिलारी यांनी मानले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT