Amit Gorkhe sakal
पुणे

Amit Gorkhe : मराठा समाजाला आरक्षण कुणालाही न दुखवता मिळावे

‘कोणत्याही समाजाला न दुखविता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘कोणत्याही समाजाला न दुखविता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी केले. आमदारकीच्या कारकिर्दीत अनुसूचित जातींसाठी काम करावयाचे आहे, असेही ते म्हणाले.

विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आमदार गोरखे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

गोरखे म्हणाले, ‘पक्षाकडून मी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी इच्छुक होतो. परंतु वॉर्ड महिला राखीव झाल्याने माझी संधी गेली. यापूर्वी दोन ते तीन वेळा अशीच संधी हुकली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघातूनही माझे नाव चर्चेत होते. परंतु पक्षाने थेट आमदार केले. आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने मातंग समाजाला विधान परिषदेवर संधी दिली नाही. परंतु भाजपने हे करून दाखविले.’

राज्यातील मागास असलेल्या ५९ जातींसाठी काम करायचे आहे. अनेक जातींना कुठलाच निधी मिळाला नाही. शैक्षणिकदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही. या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी लक्ष देणार आहे, असे सांगून गोरखे म्हणाले, ‘घटनेत बदल करण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना नॅरेटिव्ह सेट करण्यात यश आले. आरक्षण हा राजकीय विषय आहेत. कुणालाही न दुखवता सगळ्यांना कसे देता येईल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT