Maratha Kranti Morcha Fasting sakal
पुणे

Maratha Kranti Morcha : आरक्षणासाठी मराठा समाजाचे एकदिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण

मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणुन लाक्षणिक साखळी उपोषण सिंहगड रस्ता परिसरात हिंगणे चौक ,धायरी फाटा वांजळे पुल येथे सुरू आहे.

विठ्ठल तांबे

धायरी - मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणुन लाक्षणिक साखळी उपोषण सिंहगड रस्ता परिसरात हिंगणे चौक ,धायरी फाटा वांजळे पुल येथे सुरू आहे.

यावेळी 'एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, इत्यादी घोषणा देऊन उपोषण कर्ते पाठिंबा देत होते.

साखळी उपोषणास सकाळी १० ते ५ वेळात सुरू झाले. यावेळी सिंहगड रस्ता, हिंगणे विठ्ठलवाडी, वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, गोऱ्हे, डोणजे खानापूर गावांतील सर्व मराठा बांधव एकत्रितपणे  मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला खंबीर पणे विचार मांडले व साथ देऊन आरक्षणाचा पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज सहभागी झाला होता.

यावेळी राजेंद्र कोंढरे, आबा जगताप, करण जाधव, रमेश दौंडकर ,चंदन कड, श्रीकांत जगताप, सुभाष ढमाले, राजेंद्र भुरुख, राजेंद्र मिंडे, हेमंत दांगट, अविनाश चरवड, अश्विनी खाडे, विकास दांगट, गंगाधर भडावळे, कुणाल पोकळे, राहुल पोकळे, शिवाभाऊ पासलकर, सचिन चव्हाण, सचिन निवंगुणे, दशरथ मन्यारे, चंद्रशेखरदादा पोकळे, शिवाजी मते, महेश पोकळे, विजय मते, बाबासाहेब जोरे, सुभाष थेऊरकर, निलेश दमिष्टे, जयश्री पोकळे, यशवंत लायगुडे, तृप्ती पोकळे आदी उपस्थित होते. उपोषणाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT