पुणे

ओबीसी च्या हक्कांवर गंडांतर

CD

मराठा समाजातील मातब्बरांनी ‘ओबीसी’ दाखले घेतले

दशरथ फुले; नातेपुतेत पत्रकार परिषद, ओबीसींचे अस्तित्व धोक्यात असल्याचे मत

नातेपुते, ता. ३१ ः मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण झाल्याचे आज उभा महाराष्ट्र पाहत आहे. सोलापूर डीसीसी बँकेत ओबीसीच्या एका जागेवर मराठा (कुणबी) समाजातील मातब्बर नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे ओबीसीचे राजकारणातील अस्तित्व संपणार असल्याचे मत ओबीसी समाजाचे नेते दशरथ फुले यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष पद हे इतर मागासवर्गीय साठी राखीव होते. तसेच फलटण पंचायत समितीचे सभापती पद ही तर मागासवर्गीय साठी राखीव होते. तेथे मराठा समाजातील पदाधिकारी कुणबी मराठा दाखल्यावर विराजमान झाले आहेत. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही मागासवर्गीयसाठी एक जागा आहे. या एका जागेसाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल असून यामध्ये मराठा समाजातील मातब्बर घराण्यातील अजिंक्य राणा पाटील, पृथ्वीराज माने, जयकुमार माने, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर आवताडे असे मराठा समाजातील मान्यवर मराठा कुणबी समाजाच्या दाखल्यावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यातून हे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे अस्तित्व संपवले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा होता. त्यांचा निव्वळ हेतू शिक्षण आणि नोकरी यासाठी गरीब मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळावा म्हणून अनेक मराठा समाजातील आंदोलनात ओबीसी समाज सक्रियरित्या सहभागी झाला होता. आजचे चित्र उलट व खरेखुरे दिसत आहे. शिक्षण आणि नोकरी हा मुद्दा बाजूला राहिला. राजकारणात त्यांचा खरा चेहरा दिसू लागला आहे. मनोज जरांगे यांचा वापर करून मराठा समाजातील मातब्बर घराण्यातील अनेकांनी कुणबी दाखला काढून इतर मागासवर्गीय जागांवर आपला हक्क बजाऊ लागले आहेत. हे धोकादायक असल्याचे मतही फुले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लालपरीच्या जादा फेऱ्या, मुंबई विभागाचा मोठा निर्णय

Mumbai News: समुद्रात उभे राहणार नौकांचे शहर! मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार; कसा असेल ९२२ कोटींचा प्रकल्प?

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

Beed Crime : घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड एलसीबीने केला पर्दाफाश; ​४ गुन्हे उघडकीस; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT