पुणे

सकल मराठा समाज आंदोलन बाळे

CD

PNE26W48075
सोलापूर ः महामार्गावरील आंदोलनामुळे लागलेल्या वाहनांच्या रांगा.
PNE26W48074
सोलापूर ः महामार्गाच्या मधोमध ठिय्या देऊन आंदोलन करताना मराठा समाजबांधव व भगिनी.

मराठा समाजाने अर्धा तास रोखला महामार्ग
बाळे पुलाजवळ ठिय्या; सोलापूर-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस सुरू असतानाच त्यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बाळे पुलाजवळ मंगळवारी ठिय्या देत सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास रोखण्यात आला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. संतप्त आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या.

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला दहा दिवस उलटूनही सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप राजन जाधव यांनी केला. यापूर्वीही आंदोलनाच्या वेळी मंत्र्यांकडून आश्वासने देण्यात आली; मात्र त्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यावेळी केवळ आश्वासनांवर माघार घेणार नसून, मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राजन जाधव यांनी व्यक्त केला.
---------------------
आंदोलनातील ठळक मुद्दे
- अन्न-पाण्याविना उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त
- जरांगेंच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर
- मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नये
- जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचे ते स्वतः जाहीर करतील, त्याच दिवशी आम्ही आंदोलन थांबवू
- तोपर्यंत कोणतीही तडजोड केली जाणार नाही
- आंदोलनात महिला आंदोलकांनीही सहभाग
------------------------
कोट
- मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन ही निर्णायक लढाई आहे. १२ सप्टेंबरच्या बैठकीनंतर पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल. सरकार जाणूनबुजून जरांगे-पाटलांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतेय. जरांगे पाटलांच्या जीवाला जर बरं-वाईट झालं, तर मराठा समाजाचं आग्यामोहोळ उठल्याशिवाय राहणार नाही.
- सोमनाथ राऊत, मराठा आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT